Narendra Modi : सभा मोदींची पण फोटो झळकले राहुल गांधींचे, नागरीक चक्रावले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Rahul Gandhi photo On Narendra Modi Rally, Yavatmal : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे फोटो झळकल्याची घटना घडली आहे. या संबंधित फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे ही सभा पंतप्रधान मोदींची आहे की राहुल गांधींची असा संभ्रम नागरीकांमध्ये निर्माण झाला आहे.

social share
google news

Rahul Gandhi photo On Narendra Modi Rally, Yavatmal : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज यवतमाळच्या भारी येथे सभा होणार आहेत. या सभेत दोन लाखाहून अधिक महिला सहभागी होणार आहेत. या सभेची जय्यत तयारी सूरू असताना एकच गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांचे फोटो झळकल्याची घटना घडली आहे. या संबंधित फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे ही सभा पंतप्रधान मोदींची (PM Narendra Modi) आहे की राहुल गांधींची असा संभ्रम नागरीकांमध्ये निर्माण झाला आहे.(pm narendra modi yavatmal rally rahul gandhi photos in chairs viral maharashtra politics)

यवतमाळच्या भारी येथे नरेंद्र मोदी यांची आज संध्याकाळच्या सुमारास सभा पार पडणार आहे. या सभेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ सहभागी होणार असल्याची माहिती आहे. 

हे ही वाचा :भाजपचे 15 आमदार निलंबित पण, सरकार काँग्रेसचं संकटात!

पंतप्रधान मोदींच्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी सूरू असताना, सभेत राहुल गांधींचे फोटो झळकल्याची घटना घडली आहे. मोदींच्या सभेत नागरीकांसाठी लावण्यात आलेल्या खुर्च्यावर राहुल गांधींचे फोटो झळकले आहेत. खुर्च्यांवर '138 वर्षापासून एका चांगल्या भारताच्या निर्माणासाठी संघर्ष करत आहोत', अशा संदेशासह राहुल गांधी यांचा फोटो असून स्कॅन टू डोनेट असे स्टीकर्स दिसून आले आहेत. त्यामुळे ही सभा पंतप्रधान मोदी यांची की राहुल गांधी यांची असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

दरम्यान काही दिवसांपूर्वीच नागपूरात राहुल गांधी यांची सभा पार पडली होती. या सभेत राहुल गांधी यांच्या कार्यक्रमातील खुर्च्यावर अशाप्रकारेच स्टीकर्स लावण्यात आले होते. त्यामुळे ज्या कॉट्रॅक्टरने नागपुरातील काँग्रेसच्या सभेचे काँट्रॅक्ट घेतले होते. त्याच कॉट्रॅक्टरने पंतप्रधान मोदींच्या यवतमाळमधील सभेचे कॉट्रॅक्ट घेतले आहे.त्यातून हा प्रकार घडल्याचे माहिती आहे. 

हे ही वाचा :'असले चाळे बंद करा', जरांगेंनी फडणवीसांना पुन्हा ललकारलं

दरम्यान या संबंधित फोटो व्हायरल झाल्यानंतर कंपनीने खुर्च्यावरील राहुल गांधी यांचे फोटो काढण्यास सुरुवात केली होती. मात्र हे फोटो व्हायरल झाल्यानंतर काही काळासाठी ही सभा पंतप्रधान मोदी यांची की राहुल गांधी यांची अशा संभ्रम निर्माण झाला होता.
 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT