Himachal Pradesh : भाजपला झटका, 15 आमदार निलंबित; काँग्रेसचं सरकार संकटात!

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

हिमाचल प्रदेश मध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता.
himachal pradesh political crisis :
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हिमाचल प्रदेशातील सरकार संकटात

point

सुखविंदर सुक्खू यांच्या नेतृत्वाला आव्हान

point

भाजपचे १५ आमदार निलंबित

Himachal Pradesh BJP : राज्यसभा निवडणुकीनंतर जसा राजकीय भूकंप महाराष्ट्रात झाला होता, त्याचीच पुनरावृत्ती आता हिमाचल प्रदेशमध्ये होण्याची शक्यता बळावली आहे. हिमाचल प्रदेशातील मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार संकटात सापडले आहे. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसची सहा आमदार फुटले. त्यानंतर भाजप आक्रमक झाली, मात्र आता भाजपलाही झटका बसला आहे. विधानसभा अध्यक्षांनी भाजपचे १५ आमदार निलंबित केले आहेत. (Himachal Pradesh assembly Speaker expels 15 BJP MLAs)

ADVERTISEMENT

राज्यसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच हिमाचल प्रदेशच्या राजकारणात हादरे बसू लागले आहेत. संपर्काबाहेर गेलेल्या काँग्रेसच्या ८ पैकी ६ आमदारांनी भाजप उमेदवाराला मतदान केल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. यामुळे काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांचा पराभव झाला. 

भाजपने केली बहुमत चाचणी मागणी

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार फुटल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजप आक्रमक झाली. मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू यांच्या सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशी मागणी भाजपच्या नेते जयराम ठाकूर यांनी राज्यपालांकडे केली. त्यानंतर खरा राजकीय खेळ सुरू झाला. 

हे वाचलं का?

दरम्यान, काँग्रेसमधील नेतेच सुखविंदर सुक्खू यांच्यावर नाराज असल्याचेही समोर आले आहे. कॅबिनेट मंत्री आणि वीरभद्र सिंह यांचे सुपूत्र विक्रमादित्य सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सुक्खू यांच्या सरकारमध्ये काम करू शकत नाही, असे त्यांनी काँग्रेसच्या दिल्लीतील नेतृत्वाला सांगितले. 

भाजपचे १५ आमदार निलंबित 

विक्रमादित्य सिंह यांनी राजीनामा दिल्याने हिमाचल प्रदेशातील राजकारण ढवळून निघाले आहे. दुसरीकडे विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सभागृहात गदारोळ बघायला मिळाला. गोंधळात विधानसभेचे अध्यक्ष जयराम ठाकूर यांनी सुरुवातीला भाजपच्या पाच आमदारांना निलंबित केले. त्यानंतर आणखी दहा आमदारांना निलंबित करण्यात आले. 

ADVERTISEMENT

विधानसभा अध्यक्षांकडून आमदारांना निलंबित केले जाऊ शकते, याची भीती भाजपने आधीच व्यक्त केली होती. तशी तक्रार भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांकडेही केली होती. मात्र, १५ आमदार निलंबित झाल्याने भाजपला मोठा झटका बसला आहे. 

ADVERTISEMENT

सुक्खू राजीनामा देण्यास तयार?

काँग्रेसमधील काही आमदारांसह विक्रमादित्य सिंह यांनी सुखविंदर सुक्खु यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये काम करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे काँग्रेससमोर अंतर्गत कलह सोडवण्याचं आव्हान निर्माण झालं आहे. पक्षातीलच नेत्यांकडून सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न होत असल्याने सुक्खू यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार आहोत, असे सुक्खू यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठीला सांगितल्याचे सुत्रांनी सांगितले. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT