"शरद पवारांचा हात ज्याच्यावर पडतो, तो भस्म होतो", सावंतांची ठाकरेंवर अरे तुरे करत टीका

मुंबई तक

शिवसेना नेते तानाजी सावंत यांची उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

Tanaji Sawant Uddhav Thackeray : (गणेश जाधव, धाराशिव) उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर तानाजी सावंत यांच्यावर हल्ला चढवला. ठाकरेंचा एकेरी भाषेत उल्लेख करत सावंत म्हणाले की, शरद पवारांचा हात ज्याच्या डोक्यावर पडतो, त्याचा भस्म होतो. सावंतांनी केलेल्या या विधानाची आता चर्चा होत आहे. 

तानाजी सावंत यांचं ठाकरे-पवारांना लक्ष्य करणार भाषण

"मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी नव्हे तर त्यांना मांडीवरच घेऊन बसलात. बाळासाहेबांच्या... तुम्ही म्हणता ना माझ्या बापाचा पक्ष चोरला. तुझ्या बापाचे विचार तू सोडून दिले. तुझ्या बापाचा सगळा हेतू, तू अगदी पायदळी तुडवला. सत्तेसाठी...  तुझ्या लेकराच्या रोजगारासाठी तू त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला."

"दुसरी गोष्ट... त्याच्या पुढची गोष्ट... या ठिकाणी माझ्या संस्थेचे संचालक प्रा. टकले आहेत. मंत्री असताना त्यावेळी निवडणूक झाली. याचं ठरलं की, आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जायचं. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून पहिला शिवसैनिक हा तानाजी सावंत आहे, ज्याने फोन करून डायरेक्ट उद्धव ठाकरेला विचारलं होतं." 

हेही वाचा >> Ravindra Waikar यांनी उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? प्रवेशानंतर केला खुलासा

"साहेब, जो निर्णय तुम्ही घेताय तो बरोबर आहे का? ते म्हणाले 'हो, असं ठरलंय.' म्हटलं एक लक्षात ठेवा मला माझ्या बापाचा वारसा नाही राजकारणाचा. ना माझ्या घरात खासदारकी आमदारकी होती. काहीही नाही. पण, आयुष्यभर... पहिली असल्यापासून शिकत असताना पीएचडी करेपर्यंत माझं आयुष्य रानकर म्हणून गेलेलं आहे."

    follow whatsapp