Deepak Kesarkar :"उद्धव ठाकरेंवर आमचं आजही प्रेम आहे पण त्यांना जर..."

दीपक केसरकर यांनी नेमकं काय म्हटलं आहे उद्धव ठाकरेंबाबत तसंच बंडाबाबत जाणून घ्या
We love Uddhav Thackeray, what if he doesn't accept it? asks Deepak Kesarkar in mumbai tak exclusive interview
We love Uddhav Thackeray, what if he doesn't accept it? asks Deepak Kesarkar in mumbai tak exclusive interview

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आमचं आजही प्रेम आहे. त्यांच्या विरोधात बोललेलं आम्ही सहन करत नाही, करणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जर आमचं प्रेम कळत नसेल आणि त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडायची नसेल तर आम्ही काय करणार? असा प्रश्न दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. मुंबई तकचे संपादक साहिल जोशी यांनी दीपक केसरकर यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली या मुलाखतीत दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

"नेमकं काय म्हणाले आहेत दीपक केसरकर?"

आमचा लढा अडीच वर्षांनी सुरू झालेला नाही. जनमत आमच्या बाजूने होतं. २०१९ मध्ये जेव्हा भाजप सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. त्याचा फायदा शिवसेनेला काहीही झाला नाही. काँग्रेस राष्ट्रवादीची जाणीव संपली की आपण शिवसेनेमुळे सत्तेत आहोत त्यामुळे आमदार-खासदार यांचं महत्त्व कमी केलं जात होतं, हा आरोपही दीपक केसरकर यांनी केला. पराभूत आमदाराला पुढचा आमदार हाच असेल हे सांगितलं जात होतं. त्यावेळी त्यांचा कान का धरला नाही? उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुख म्हणून हे काम होतं हेदेखील दीपक केसरकर म्हटले आहेत.

आमच्या रक्तात आजही शिवसेनाच आहे.. ती नाही असं कसं म्हणता?

आज आम्हाला हे सुनावलं जातं आहे की तुमच्या रक्तात शिवसेना नाही. रक्तात शिवसेना आहेच ना. आमचं आजही उद्धव ठाकरेंवर प्रेम आहे. माझ्या हातात जो धागा आहे तो त्यांनीच बांधलेला आहे. त्यातूनच प्रयत्न करतो आहोत. आम्हाला प्रतिसाद द्यायचा की नाही हा सर्वस्वी उद्धव ठाकरेंचा निर्णय आहे असंही दीपक केसरकर यांनी म्हटलंय.

आमच्या पक्षप्रमुखांवर टीका झाली तेव्हा आम्ही सांगितलं की हे आम्ही सहन केलं जाणार नाही. हे सांगतोच आहोत तरीही आमच्या प्रेमाची किंमत उद्धव ठाकरेंना नसेल तसंच त्यांच्या बाजूला असलेल्या लोकांचंच त्यांना ऐकायचं असेल तर आम्ही तरी काय करू शकतो.

आम्ही महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण व्हायच्या आत काय काय सुरू आहे ते आम्ही सांगितलं होतं. बंडाची सुरूवात तिथूनच झाली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला या सगळ्याचा विसर पडला होता. त्या सगळ्यांना जाब का विचारला गेला नाही हा प्रश्नही दीपक केसरकर यांनी विचारला.

बाळासाहेबांनी जगावेगळे निर्णय घेतले. पण त्या त्या परिस्थितीमुळे घेतले जातात. युतीचा निर्णय हा उद्धव ठाकरे यांनीच २०१९ ला पुन्हा एकदा घेतला होता. भाजप हा नैसर्गिक मित्र आहे. भाजपसोबत जायचं नसेल तर २०१९ लाही एकटं लढलो असतो. आम्ही राष्ट्रीय नेते म्हणून नरेंद्र मोदींनाच पाहतो. नरेंद्र मोदी यांनी हिंदुत्व राष्ट्रीय पातळीवर नेलं. पक्ष वाढवला. बाळासाहेब ठाकरे यांच्या मनातलं कलम ३७० मोदींनी रद्द करून दाखवलं ना असंही दीपक केसरकर म्हटले आहेत.

उद्धव ठाकरेंवर आमचं कालही प्रेम होतं आजही आहे. भाजपने आमच्यासोबत संवाद साधणं बंद केला नव्हता. तो शिवसेनेकडून झाला. त्यात संजय राऊत यांच्यामुळे झाला. शिवसैनिक मुख्यमंत्री बसेल हे सांगितलं गेलं होतं. नंतर काय घडलं ते सगळ्यांना माहित आहे असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in