मुंबईत मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती दोन्ही पाहिले, उद्धव ठाकरेंचा अमित शाह यांना टोला
मुंबईत आपण सोमवारी मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती दोन्ही पाहिले असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शेलक्या शब्दांमध्ये अमित शाह यांना टोला लगावला आहे. भास्कर जाधव यांना शिवसेनेच्या नेतेपदाची जबाबदारी आज उद्धव ठाकरेंनी दिली. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी हा टोला लगावला आहे. तसंच आपल्यावर आता लढण्याची वेळ आली आहे कारण हे शिवसेना संपवायला निघाले आहेत असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. […]
ADVERTISEMENT

मुंबईत आपण सोमवारी मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती दोन्ही पाहिले असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शेलक्या शब्दांमध्ये अमित शाह यांना टोला लगावला आहे. भास्कर जाधव यांना शिवसेनेच्या नेतेपदाची जबाबदारी आज उद्धव ठाकरेंनी दिली. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी हा टोला लगावला आहे. तसंच आपल्यावर आता लढण्याची वेळ आली आहे कारण हे शिवसेना संपवायला निघाले आहेत असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
दसरा मेळावा शिवसेनेचा म्हणजे आमचाच होणार, उद्धव ठाकरे यांची गर्जना
नेमकं काय म्हटलं आहे उद्धव ठाकरेंनी?
मुंबईत सोमवारी आपण मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती बघितले. गणपतीच्या मंडपात देखील त्यांना राजकारण दिसलं. गणपती जिथे आहे तिथे काही अभद्र बोलू नये पण ते बोलून गेले. गणपती हा बुद्धी दाता आहे, त्यांनी सर्वांना सुबुध्दी द्यावी असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांना टोला लगावला आहे.
शिवसेनेचा संघर्षाचा काळ आहे
काल ते म्हणाले की यांना जमीन दाखवायची आहे. जमीन दाखवल्यावर काय बोलायचं ते बोलू. थोडक्यात काय तर आत्ता संघर्षाचा काळ आहे. शिवसेना त्यांना संपवायची आहे. मात्र जोपर्यंत कडवट आणि निष्ठावान शिवसैनिक माझ्यासोबत आहेत तोपर्यंत मला चिंता नाही. निष्ठा ही किती बोली लावली तरीही विकली जाऊ शकत नाही.