हिजाबच्या बाजूनं आणि विरोधात सुप्रीम कोर्टात दोन्ही न्यायाधीश नेमकं काय म्हणाले?
शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी घालणार की नाही? आता सर्वोच्च न्यायालयाचे तीन न्यायाधीशांचे खंडपीठ यावर निर्णय देणार आहे. आज सुप्रीम कोर्टातील दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाचा निर्णय वेगवेगळा आला आहे. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिका फेटाळल्या, तर न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय चुकीचा ठरवला. हिजाब बंदीबाबत न्यायमूर्ती हेमंत गुप्ता […]
ADVERTISEMENT

शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी घालणार की नाही? आता सर्वोच्च न्यायालयाचे तीन न्यायाधीशांचे खंडपीठ यावर निर्णय देणार आहे. आज सुप्रीम कोर्टातील दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाचा निर्णय वेगवेगळा आला आहे. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिका फेटाळल्या, तर न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय चुकीचा ठरवला.
हिजाब बंदीबाबत न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्यातील मतभेदामुळे आता हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे जाणार आहे. या खंडपीठातील तीन न्यायाधीश कोण असतील? यावर सरन्यायाधीश निर्णय घेतील.
कर्नाटक उच्च न्यायालयाने यावर्षी 15 मार्च रोजी हा निर्णय दिला होता
सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने 22 सप्टेंबर रोजी हिजाब प्रकरणी आपला निर्णय राखून ठेवला होता. हे संपूर्ण प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात होते, ज्यामध्ये उच्च न्यायालयाने म्हटले होते की हिजाब इस्लामचा आवश्यक भाग नाही. कर्नाटक उच्च न्यायालयाने यावर्षी 15 मार्च रोजी हा निर्णय दिला होता.