सुषमा अंधारेंचा 'लाव रे तो व्हिडिओ', थेट पंतप्रधान मोंदींवर चढवला हल्ला - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / सुषमा अंधारेंचा ‘लाव रे तो व्हिडिओ’, थेट पंतप्रधान मोंदींवर चढवला हल्ला
बातम्या राजकीय आखाडा

सुषमा अंधारेंचा ‘लाव रे तो व्हिडिओ’, थेट पंतप्रधान मोंदींवर चढवला हल्ला

What will Sushma Andhare answer after the serious allegations made by a Shiv Sainik in Beed

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (sushma andhare)  यांनी आज बीडच्या महाप्रबोधनी यात्रेत ‘लाव रे तो व्हिडिओ’ लावून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Pm Narendra Modi) टीकेचे बाण सोडले आहेत. महाप्रबोधनी यात्रेत पंतप्रधानांचे तीन व्हिडिओ सभेत लावले होते. या तीनही व्हिडिओतील मुद्यावरून सुषमा अंधारे यांनी पंतप्रधानांना घेरले आहे.

पहिला व्हिडिओ….

सुषमा अंधारे यांनी सभेत पहिला ‘लाव रे तो व्हिडिओ’ सुरु केला.या व्हिडिओत पंतप्रधान महागाईवर बोलत होते. या व्हिडिओचा आधार घेत सुषमा अंधारे म्हणाल्या, जेव्हा या देशात गॅस 450 रूपयात मिळत होता, तेव्हा, यांना फार महागाई वाटत होती. यांच्यातल्याच एक बाई सिलेंडवर बसायच्या आणि महागाई वाढली म्हणायच्या. आता सिलेंडरचा भाव साडे अकराशे ते बाराशेच्या घरात गेलाय. पेट्रोल-डिझेलचे दर देखील वाढले आहेत, अशी अंधारे यांनी मोदी यांना आठवण करून दिली.

दुसरा व्हिडिओ…

दुसऱ्या ‘लाव रे तो व्हिडिओ’मध्ये पंतप्रधान मुस्लिमांना संबोधित करते होते. यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, मी महागाईवर प्रश्न विचारते, तेव्हा ते म्हणतात हिंदू खतरें में है,मी बेरोजागारीवर विचारला तरी हिंदू खतरे मे है, महिला सुरक्षेचे काय हिंदू खतरे मे है! हिंदू खतरे मे है त्यांना कधी आठवत माहितीय, जेव्हा उद्धव ठाकरे मुस्लिमांसोबत बसतात उठतात, जेव्हा संजय राऊतांचे मुस्लिम समुदाय स्वागत करतो, अशी टीका त्यांनी पंतप्रधान मोदींवर केली. हे काय नौटकी करतात, ज्यांना अरबीचे उच्चार येत नाही, जे टेलिप्रॉम्पटरवर वाचून दाखवतात. अरे एवढा नाद आहेत तर नौटकी कशाला करता, अभ्यास करा आणि बोला असा सल्ला देखील अंधारे यांनी मोदी यांना दिला.

हे ही वाचा : ‘…तर मी राजकारण सोडेन’, संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान

भाजपचं हिंदूत्व, हे हिंदू-मुस्लिम दंगली करून लोकांची घरे पेटवणार हिंदूत्व असल्याची टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.तर हे हिंदुत्व आम्हाला नकोय, उद्धव ठाकरेंचं गोर गरीबांच्या घरी चुली पेटवणारे हिंदुत्व महाराष्ट्राला हवंय, असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

तिसरा व्हिडिओ…

तिसऱ्या व्हिडिओत पंतप्रधान मोदी गणिताचा एक फॉर्म्युला सांगतात.या व्हिडिओवरून देखील अंधारेंनी मोदींना घेरले होते. पंतप्रधान मोदी लोकांना वेड्यात काढतात, किती जणांच्या खात्यात आले 15 लाख आले? तरूणांच्या रोजगाराचे काय? असे अनेक सवाल अंधारे यांनी यावेळी उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीसांचाही लावला व्हिडिओ

‘लाव रे तो व्हिडिओ’मध्ये देवेंद्र फडणवीसांचाही व्हिडिओ लावला. या व्हिडिओमध्ये फडणवीस राष्ट्रवादीसोबत जाणार नसल्याचे विधान करताय. या व्हिडिओवरून अंधारे यानी फडणवीसांवर टीकेची तोफ डागली. तिकडे केंद्रात मोदी फेकतात इकडे राज्यात फडणवीस खोट बोलतात. आणि फडणवीसांनी राष्ट्रवादीसोबत युती केली तर हिंदुत्व धोक्यात येत नाही, पण शिवसेनेने महाविकास आघाडी सोबत गेली तर हिंदुत्व धोक्यात येते, अशी टीका देखील त्यांनी फडणवीसांवर केली.

हे ही वाचा : काँग्रेसचे आशिष देशमुख भाजपच्या वाटेवर? कोणत्या नेत्याचा होणार गेम?

तसेच आम्हाला आनंदाचा शिधा नको, याउलट गोर गरीबांच्या लेकरांना मोफत शिक्षण द्या. त्याची जास्त गरज आहे. तसेच महिलांना एसटीचे तिकीट नको, आम्हाला साडेबाराचा गॅस पुन्हा साडेतीनशेला द्य़ा,अशी टीका देखील सुषमा अंधारे यांनी केली.

Train Accident: सर्वात भयंकर ट्रेन अपघात, फोटो पाहून आपणही हादरून जाल! Isha Ambani चा रॉयल बंगला! प्रत्येक कोपरा हिऱ्यासारखा चकाकणारा.. MS Dhoni ने चाहत्यांची ‘ही’ इच्छा केली पूर्ण! Viral Video पाहिलात का? निसा देवगनसोबत ‘हा’ तरूण आहे तरी कोण?, Photo Viral Sanya Malhotra : 31 वर्षीय अभिनेत्रीला इम्पोस्टर सिंड्रोमने ग्रासले, सांगितला अनुभव! Anemia : शरीरात असेल रक्ताची कमतरता.. तर खा फक्त ‘हे’ फळ! ‘हे’ बॉलिवूड सेलिब्रिटी जे मुलं असूनही अनाथांचे झाले ‘मायबाप’ Malaika Arora च्या प्रेग्नेंसीवरून अर्जुन भडकला! कारण.. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे ‘गागाभट्ट’ कोण? IND-AUS : WTC फायनलमध्ये ड्रॉ झाली तर, विजेता कोण ठरणार? शिवराज्याभिषेक म्हणजे काय? shiv Rajyabhishek 2023 : 350 वर्षापूर्वी किल्ले रायगडावर घडला होता इतिहास Sonakshi Sinha : …अन् सलमान खानने तिचं नशीबच बदलून टाकलं आश्चर्यकारक! चक्क 3 फुटांची गाय 30 किलो वजन घटवलं, अन् अभिनेत्रीला मिळाला बॉलिवूडमध्ये ब्रेक चित्रपटाच्या शुटिंगनंतर हिरो-हिरोईनच्या महागड्या आउटफिट्सचं काय होतं? Akshay Kumar सोबत ‘टिप टिप बरसा पानी’च्या शूटिंगपूर्वी रवीनाने कोणत्या अटी घातल्या? Sara Tendulkar अडीच तास अडकली ट्रॅफिकमध्ये, Video Viral Dinesh Kartik : बायकोने मित्राशीच संसार थाटला, आयुष्य झाले उद्धस्त अन्.. लव्ह की अरेंज मॅरेज? Jaya Kishori ने लग्नाच्या मुद्द्यावर सोडलं मौन!