‘…तर मी राजकारण सोडेन’, संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान

मुंबई तक

ADVERTISEMENT

sanjay rauts direct challenge to the cm ekanath shinde
sanjay rauts direct challenge to the cm ekanath shinde
social share
google news

Sanjay rauts direct challenge to the CM Ekanath shinde : आम्हाला म्हणतात,नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून जिंकलात, मते मांगितलीत.आता या 40 मिंधेंनी मोदीचा फोटो लावून जिंकून दाखवाव, मी राजकारण सोडेन, असे थेट आव्हानच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath shinde) यांना दिले आहे. संजय राऊत बीडच्या महाप्रबोधिनी सभेत बोलत होते. (…then i will quit politics sanjay rauts direct challenge to the cm ekanath shinde)

50-50 कोटीचा आनंदाचा शिधा

एक किलो साखर, चना डाळ, पाम तेल, एक कोटी आणि 75 लाख लोकांसाठी, आनंदाचा शिध्याखाली भीक देताय का? असा रोखठोक सवालच संजय राऊत यांनी केला. तसेच त्या 40 लफग्यांना, चोरांना 50-50 कोटीचा आनंदाचा शिधा, फक्त शिवसेना फोडण्यासाठी आणि महाराष्ट्र गहाण ठेवण्यासाठी दिल्याचा टीका देखील राऊत यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयाने एका वाक्यात सांगितले, सरकार घटनाबाह्य आहे, सरकार बेकायदेशीर आहे. उद्धव ठाकरेंनी नैतिकतेवर राजीनामा दिला नसता तर त्यांना सर्वाच्च न्यायालयाने त्यांना परत मुख्यमंत्री केले असते. याचा अर्थ ते मुख्यमंत्री आहेत. पण मिंधेना लाज असतील तर इतक्या लाथा घातल्यावर नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा दिला असता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : सुषमा अंधारेंचा ‘लाव रे तो व्हिडिओ’, थेट पंतप्रधान मोंदींवर चढवला हल्ला

आम्हाला म्हणतात,नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून जिंकलात, मते मांगितलीत.बाळासाहेब ठाकरे एक लाख मोदींवर भारी होते, असे देखील राऊत म्हणाले आहेत. कर्नाटकात मोदींनी 36 जाहीर सभा, 27 रोड शो घेतल्या, त्या प्रत्येक मतदार संघात भाजपचा पराभव झाला. आता या 40 मिंधेंनी मोदीचा फोटो लावून जिंकून दाखवाव, मी राजकारण सोडेन, असे थेट आव्हानच संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.

2000 च्या बंडली भाजपच्या शेटजींकडे

कोणाच्या खिशात जर 2000 ची नोट असेल तर मला दाखवा.आमच्याकडे 500 रूपये पण राहिले नाही आणि 2000 च्या नोटेवर बंदी घालताय. 2000 नोटांची बंडली त्या 50 खोकेवाल्यांकडे, भाजपच्या शेटजींकडे, मंत्र्याकडे आमदारांकडे, गौतम अदानी आणि अंबानीकडे असल्याची टीका देखील संजय राऊत यांनी केली. बीडच्या शेतकरी, गरीब जनतेकडे आज एकवेळ चुळ पेटेले की नाही अशी अवस्था आहे, असेही राऊत म्हणाले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : काँग्रेसचे आशिष देशमुख भाजपच्या वाटेवर? कोणत्या नेत्याचा होणार गेम?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT