समजून घ्या: ठाकरेंचे माजी पार्टनर.. शिंदेंचे शिलेदार, अजय आशर आहेत तरी कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Ajay Ashar: मुंबई: भारतात ज्या प्रमाणे राष्ट्रीय पातळीवर निती आयोग आहे त्याचप्रमाणे आता महाराष्ट्रात देखील एक संस्था स्थापन करण्यात आली आहे. (Maharashtra institution of transformation) (मित्र) हे एक नियमक मंडळ राज्य शासनाकडून तयार करण्यात आलं आहे. ज्यामध्ये राज्य शासनाने नियमक मंडळ देखील स्थापन केलं आहे. ज्याच्या उपाध्यक्ष पदी अजय आशर यांची नेमणूक करण्यात आली आहे. जे व्यवसायाने बिल्डर आहेत. त्यांची या महत्त्वाच्या पदावर वर्णी लागली आहे. हे अजय आशर नेमके आहेत तरी कोण… आणि याच अजय आशर यांच्यावरुन भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) कसा निशाणा साधलाय हे जाणून घेऊयात सविस्तर. (who is ajay asher who has been appointed to governing body of maharashtra institution of transformation)

सगळ्यात आधी जाणून घ्या अजय आशर आहेत तरी कोण..

अजय आशर हे रियल इस्टेटमधील आशर ग्रुपचे चेअरमन आहेत. त्यांच्या या ग्रुपचे मुंबई-ठाण्यात अनेक मोठे प्रोजेक्ट सध्या सुरु आहेत. ज्यांची नियुक्ती MITRA चे उपाध्यक्ष म्हणून करण्यात आली आहे.

अजय आशर यांच्यावरुन सोमय्यांनी आदित्य ठाकरेंवर काय आरोप केलेले?

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये एका पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरे कुटुंबीयांवर काही आरोप केले होते. उद्धव ठाकरेंवर त्यांनी आरोप केलेच होते. सोबतच त्यांनी आदित्य ठाकरेंवर देखील ऑफिस ऑफ प्रॉफिटचा भंग केल्याचा आरोप केला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सोमय्यांचा असा आरोप होता की, आदित्य ठाकरे हे मंत्रिपदावर असताना देखील काही कंपन्यांमध्ये अजय आशर यांच्यासोबत भागीदार होते.

ज्यावेळी एखादी व्यक्ती मंत्री किंवा महत्त्वाच्या संविधानिक पदावर असताना त्या व्यक्तीला एखाद्या कंपनीच्या महत्त्वाच्या पदावर राहता येत नाही. याचाच हवाल देत सोमय्यांनी आदित्य ठाकरेंवर ऑफिस ऑफ प्रॉफिटचा भंग केल्याचा आरोप केला होता.

ADVERTISEMENT

भ्रष्टाचाराचं स्मारक तोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हातात हातोडा दिला : किरीट सोमय्या

ADVERTISEMENT

याच पत्रकार परिषदेत सोमय्यांनी एक पत्रही समोर आणलं होतं. जे 2019 चं आहे. ज्यामध्ये आदित्य ठाकरेंनी असं म्हटलं होतं की, मी आशर प्रोजेक्टमधील भागीदार म्हणून राजीनामा देत आहे. ज्यावर तारीख 15 जुलै 2019 ही होती.

पण यापुढे किरीट सोमय्यांनी आणखी एक कागद समोर आणला ज्यामध्ये त्यांनी दोन कंपन्यांना अधोरेखित केलं होतं. याच दोन कंपन्यांमध्ये आदित्य ठाकरे हे मंत्री असतानाही मार्च 2020 पर्यंत भागीदार असल्याचं सोमय्यांनी त्यावेळी म्हटलं होतं. सोमय्यांचा याबाबत हाच आक्षेप होता की, आदित्य ठाकरे मंत्री असताना देखील दोन कंपन्यांमध्ये भागीदार होते.

किरीट सोमय्यांनी नेमका काय आरोप केलेला?

‘उद्धव ठाकरेजी आपली मोठमोठ्या बिल्डरसोबत भागदारी आहे. आपल्या मुलाची ठाण्याचे जे प्रसिद्ध आशर बिल्डर आहेत त्यांच्यासोबत पार्टनरशीप आहे. आज मी कागदपत्र तुमच्या समोर ठेवलं आहे. आपले पुत्र मंत्रिपदाची शपथ घेतात आणि त्यानंतरही स्वत:चा व्यवसाय चालू ठेवतात. मी दोन कंपन्यांची नावं दिली त्यात आपले पुत्र आदित्य ठाकरे मंत्री झाल्यानंतर देखील 100 हून अधिक दिवस त्या कंपनीचे भागीदार होते. हा ऑफिस ऑफ प्रॉफिटचा भंग नाही का?’ असा सवाल त्यावेळी सोमय्यांनी केला होता.

‘…अन् बाप्पा माझ्यासमोर हसले; किरीट सोमय्यांनी Lalbaugcha Raja कडे काय मागितलं?

आता सगळ्यात आशर ग्रुपमधून आदित्य ठाकरेंनी राजीनामा तर दिला होता. पण मग आता आशर ग्रुपचा मुद्दा नेमका पुन्हा का चर्चेत आला आहे. तर याबाबतही जाणून घेऊयात सविस्तर

अजय आशर हे ज्या कंपनीचे संचालक आहेत त्याच कंपनीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर हे देखील भागीदार आहेत. त्यामुळे अजय आशर हे ठाकरेंशी संबंधित आहेत. आधी आदित्य ठाकरे नंतर श्रीधर पाटणकर ही नावं त्यांच्या कंपनीमध्ये पाहायला मिळाली आहेत. असं असतानाही याच अजय आशर यांची शिंदे सरकारने MITRA वर नियुक्ती केलीए.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT