ज्यांच्या घरात २० कोटींच्या नोटांचा खच सापडला त्या अर्पिता मुखर्जी आहेत तरी कोण?

मुंबई तक

पश्चिम बंगाल सध्या शिक्षण विभागातील एका मोठ्या घोटाळ्यामुळे चर्चेत आला आहे. ईडीने कारवाई करत ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक केली आहे. पार्थ चॅटर्जी हे ममता बॅनर्जी सरकाकरमध्ये सध्या उद्योगमंत्री असून पूर्वी त्यांच्याकडे शिक्षण खातं होतं. मंत्री महोदयांची निकटवर्तीय मानली जाणारी अर्पिता मुखर्जी यांना देखील ताब्यात घेतले असून त्यांच्या घरून आतापर्यंत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पश्चिम बंगाल सध्या शिक्षण विभागातील एका मोठ्या घोटाळ्यामुळे चर्चेत आला आहे. ईडीने कारवाई करत ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक केली आहे. पार्थ चॅटर्जी हे ममता बॅनर्जी सरकाकरमध्ये सध्या उद्योगमंत्री असून पूर्वी त्यांच्याकडे शिक्षण खातं होतं. मंत्री महोदयांची निकटवर्तीय मानली जाणारी अर्पिता मुखर्जी यांना देखील ताब्यात घेतले असून त्यांच्या घरून आतापर्यंत 20 कोटी पेक्षा जास्त रोख रक्कम, सोनं आणि काही विदेशी चलनाच्या नोटा देखील ईडीने जप्त केल्या आहेत.

अजून देखील ईडीची कारवाई सुरु असून नोटा मोजण्यासाठी आणखी दोन मशिन मागवण्यात आल्या आहेत. ममता सरकारमधील महत्वाचा मंत्री मोठ्या घोटाळ्यात अडकल्याने हा मोठा धक्का मानला जात आहे. पश्चिम बंगालमधील विरोधी पक्ष असलेला भाजप सध्या या घोटाळ्यावरुन टीएमसी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न करीत आहे.

26 तास चौकशी केल्यानंतर पार्थ चॅटर्जींना अटक

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या शिक्षक भरतीमध्ये मोठ्याप्रमाणात अनियमितता झाली होती. ज्यात मोठ्या प्रमाणात पैशांची देवाण घेवाण करण्यात आली होती. हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा असल्याने ईडी या प्रकरणाची चौकशी करत होती. या दरम्यान शुक्रवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी पार्थ चॅटर्जींच्या घरावर छापा मारला. एसएससी घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी झाली. तब्बल 26 तासांच्या चौकशीनंतर ईडीने पर्थ चॅटर्जी यांना अटक केली आहे. अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले आहे. त्यानंतर त्यांना कोर्टासमोर हजर केले जाईल.

अर्पिताच्या घरून 21 कोटी रोकड, सोनं आणि विदेशी चलन जप्त

पार्थ यांच्या घरावर छापेमारी सुरु असताना त्याच वेळी काही अधिकाऱ्यांनी अर्पिता मुखर्जी हिच्या घरावरही छापे मारले. येथून २१ कोटी २० लाखांची रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. नोटांच्या ढिगाऱ्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. याच शिक्षक भरती घोटाळ्यातून कमावलेल्या या नोटा असल्याचे बोलले जात आहे. यासह अर्पिताच्या घरून ७९ लाखांचे दागिने, ५४ लाखांच्या विदेशी चलनाच्या नोटा जप्त केल्या आहेत. आणखी देखील कारवाई सुरु असून अर्पिताच्या घरातील नोटा मोजण्यासाठी दोन मशीन मागवण्यात आल्या आहेत.

ममता बॅनर्जी सरकारमध्ये पार्थ चॅटर्जी हे महत्वाचे नेते मानले जातात. ते सध्या उद्योग खात्याची जबाबदारी पाहत आहेत. तर पूर्वी त्यांच्याकडे शिक्षण खातं होतं. २००१ पासून ते सलग पाचवेळा पश्चिम बंगालच्या विधानसभेत निवडून गेले आहेत. त्यामुळे टीएमसीचे ते महत्वाचे नेते मानले जातात. पक्षात त्यांच्या शब्दाला किंमत आहे. मात्र, एक वजनदार नेत्याला भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यात अटक झाल्याने टीएमसी पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.

कोण आहे अर्पिता मुखर्जी?

शुक्रवारपासून नोटांचं ढिग असणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोलकाता येथील अर्पिता मुखर्जी यांच्या घरी हा नोटांचा ढिग सापडला आहे. अर्पिता या बंगाली चित्रपटात काम करत होत्या. बंगाली चित्रपटात अनेक साईड रोल त्यांनी साकारल्या आहेत. बंगालीसह ओडिया, तमिळ चित्रपटात देखील त्यांनी काम केलं आहे. याच बरोबर बंगाली टीव्ही सिरीयल्समध्ये देखील त्यांनी काम केलं आहे. तृणमूलचे नेते पार्थ चॅटर्जी हे कोलकातातील लोकप्रिय दुर्गा पुजा समितीचं नेतृत्व करतात. 2019 आणि 2020 साली दुर्गा पुजा सोहळ्यात प्रमुख चेहरा होती. तेंव्हापासून हे दोघे संपर्कात आल्याचं बोललं जातं.

हे वाचलं का?

    follow whatsapp