देवेंद्र फडणवीस यांचा पत्ता अमित शाह यांनी कापल्याची चर्चा नेमकी का सुरू झाली आहे?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राच्या राजकारणात २१ जूनला सर्वात मोठा राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारून आम्हीच बाळासाहेबांची शिवसेना असल्याचा दावा केला. तर दुसरीकडे आपण भाजपसोबतच गेलं पाहिजे ही मागणीही लावून धरली. या सगळ्या बंडात एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतले ३९ आमदार गेले. त्यामुळे सरकार पडणार हे निश्चित झालं होतं ते तसं घडलंही.

“मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की…” एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

सगळ्या नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्यानंतर उत्सुकता होती ती शिंदे गटाच्या साथीने भाजप सत्तेत येणार याची. एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील ही चर्चाही रंगली होती. ३० जूनच्या दुपारपर्यंत हीच चर्चा सगळीकडे रंगली होती. अगदी भाजप महाराष्ट्रच्या ट्विटर हँडलनेही मी पुन्हा येईन ही देवेंद्र फडणवीस यांची कविता ट्विट करून या सगळ्या घडामोडींना एक अर्थ दिला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना….. शरद पवार यांचा टोला

एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईत आले, त्यानंतर त्यांनी फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. भेट घेतल्यानंतर या दोघांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होण्याची घोषणा करतील हे अपेक्षित असतानाच त्यांनी एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील हे जाहीर केलं. तसंच आपण सत्तेत असणार नाही पण सरकारवर लक्ष ठेवणार हे देखील सांगितलं.

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या एका वक्तव्यामुळे सगळ्याच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. धक्कातंत्र काय असतं ते पुन्हा एकदा भाजपने सिद्ध केलं. मात्र खऱा ट्विस्ट पुढे होता. शिंदे यांच्या शपथविधीला एक तास बाकी असतानाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस हे सत्तेत सहभागी होतील आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील हे जाहीर केलं. त्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनीही हीच बाब जाहीर केली. मग देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

ADVERTISEMENT

शपथ घेताना देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पूर्णपणे पडला होता. तसंच त्यांचा आक्रमक आवाजही काहीसा शांत झाला होता. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायच्या अवघा एक तास आधी ही बातमी आल्याने आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याने त्यांचा हा ‘गेम’ गृहमंत्री अमित शाह यांनी केल्याची चर्चा ट्विटरवर रंगलीये.

काय म्हणत आहेत ट्विटरवर लोक?

सिद्धार्थ राजपूत नावाच्या एका युजरने द किंग मेकर मोटाभाई हे म्हणत मोटर सायकल को कार बना दूं.. खंबे को मै तार बना दूं हे वाक्य ट्विट केलंय. अभिषेक नावाच्या युजरने कमेंट केलीये तो म्हटलाय की बहुत तकलीफ होती है.. जब आप योग्य हो.. और लोग आपकी योग्यता न पहचाने..काहींनी या सगळ्याला अमित शाह यांचा फोटो ट्विट करत सत्तामें आता हूं, समजमें नही. हे वाक्य लिहिलंय.

Ardent_Indian नावाच्या युजरचंही ट्विट भन्नाट आहे. आमिर खानच्या थ्री इडियट्स सिनेमातला डायलॉग ट्विट केलाय. कुर्सी के पिछे मत भागो, फडणवीस के पिछे भागो कुर्सी अपने आप तुम्हारे पिछे भागेगी हे ट्विट केलंय. ट्विटरवर ही चर्चा जोरदार रंगलीये की देवेंद्र फडणवीस यांचा पत्ता अमित शहा यांनी कट केला.

ही चर्चा का होतेय, त्याची कारणं काय

देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील या चर्चा ३० जूनच्या दुपारपर्यंत रंगल्या होत्या, मात्र दुपारच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील हे देवेंद्र फडणवीस यांनीच जाहीर केलं.

यानंतर फडणवीस यांनी हे जाहीर केलं होतं की मी सत्तेत नसेन. यानंतर फडणवीस यांचं कौतुक होत होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होतील या बातम्या आल्या तसंच त्यांनी शपथही घेतली.

सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंकडे देत भाजपने केलेली खेळी हा सेनेला पर्यायाने उद्धव ठाकरे यांना शह दिला बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केल्याचं क्रेडिट घेतलं.

देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करून चेहरा जपण्याआधी आम्ही पक्ष जपतो हा संदेश दिला गेला

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची तोंडं बंद केली. तसंच नंतर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करून सरकारवर आपलाच वचक असेल हेदेखील दाखवून दिलं.

भाजपने केलेल्या खेळीचे अर्थ खरंतर अनेक निघतात. मात्र दूरदृष्टी ठेवून ही खेळी भाजपने केली आहे. त्याचे परिणाम येत्या काळात पाहता येतील. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झालेत मात्र चर्चा देवेंद्र फडणवीस यांचीच होते आहे. याचाच गहिरा अर्थ लक्षात घेतला तर हा अमित शाह यांचा मास्टर स्ट्रोक आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT