Mr. 360 degree retire : एबी डिव्हीलियर्सची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

मुंबई तक

दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू एबी डिव्हीलियर्सने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून आज आपली निवृत्ती जाहीर केली आहे. विशेषकरुन वन-डे आणि टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या 360 degree डिव्हीलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगलाच प्रसिद्ध होता. आजच्या निर्णयानंतर एबी डिव्हीलियर्सच्या १७ वर्षांच्या करिअरला ब्रेक लागला आहे. डिव्हीलियर्सच्या या निर्णयामुळे त्याचं आयपीएलमधलं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमधलं नात संपुष्टात आलं आहे.११४ कसोटी सामने, २२८ […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू एबी डिव्हीलियर्सने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून आज आपली निवृत्ती जाहीर केली आहे. विशेषकरुन वन-डे आणि टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या 360 degree डिव्हीलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगलाच प्रसिद्ध होता. आजच्या निर्णयानंतर एबी डिव्हीलियर्सच्या १७ वर्षांच्या करिअरला ब्रेक लागला आहे.

डिव्हीलियर्सच्या या निर्णयामुळे त्याचं आयपीएलमधलं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमधलं नात संपुष्टात आलं आहे.११४ कसोटी सामने, २२८ वन-डे सामने आणि ७८ टी-२० सामन्यांमध्ये डिव्हीलियर्सने दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधीत्व केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन डिव्हीलियर्सने निवृत्तीची घोषणा केली.

आपल्या निवृत्तीच्या स्टेटमेंटमध्ये डिव्हीलियर्सने आतापर्यंतच्या प्रवासात साथ दिलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत. “आतापर्यंतचा माझा प्रवास खूपच संस्मरणीय झाला, पण आता मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त व्हायचा निर्णय घेतला आहे. जेव्हापासून मी माझ्या भावासोबत घराशेजारच्या गल्लीत क्रिकेट खेळायला लागलो तेव्हापासून मी त्याच उर्जेने क्रिकेटचा आनंद घेत आलो आहे. परंतू आता वयाच्या ३७ व्या वर्षी ती उर्जा फारशी राहिलेली नाही”, असं म्हणत एबीडीने क्रिकेटला अलविदा करायचं ठरवलं आहे.

दरम्यान, एबी डिव्हीलियर्सचा RCB संघातला सहकारी आणि कर्णधार विराट कोहलीनेही ही बातमी ऐकल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“आतापर्यंतच्या माझ्या प्रवासात माझा परिवार, माझा भाऊ आणि माझ्या पत्नीने मला दिलेल्या सहकार्याशिवाय हे शक्यच झालं नसतं. आता माझ्या आयुष्याचा उर्वरित भाग मी परिवारासोबत घालवू इच्छितो.” डिव्हीलियर्सने २०१८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp