अनुष्का शर्माची विराट कोहलीसाठी खास पोस्ट! म्हणाली, “मी नेहमीच…”

मुंबई तक

आशिया कप २०२२ च्या सुपर ४ सामन्यात भारताचा स्टार बॅट्समन विराट कोहलीने अफगाणिस्तानच्या विरोधात दमदार खेळी केली. १२२ धावा विराटने या मॅचमध्ये केल्या. सुमारे तीन वर्षांनी विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकवलं. विराटने आपली खेळी पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकाला डेडिकेट केली आहे. तसंच आपण कठीण काळातून जात होतो त्यावेळी अनुष्का कायमच पाठिशी उभी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आशिया कप २०२२ च्या सुपर ४ सामन्यात भारताचा स्टार बॅट्समन विराट कोहलीने अफगाणिस्तानच्या विरोधात दमदार खेळी केली. १२२ धावा विराटने या मॅचमध्ये केल्या. सुमारे तीन वर्षांनी विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकवलं. विराटने आपली खेळी पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकाला डेडिकेट केली आहे. तसंच आपण कठीण काळातून जात होतो त्यावेळी अनुष्का कायमच पाठिशी उभी राहिली असंही विराटने म्हटलं आहे. यानंतर आता विराटसाठी अनुष्काने पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट चर्चेत आहे.

काय आहे विराटसाठी अनुष्काने लिहिलेली पोस्ट?

अनुष्का शर्माने विराट कोहलीचे टीम इंडियाच्या जर्सीमधले फोटो शेअर केले आहेत. तसंच तिने हे लिहिलं आहे की मी कोणत्याही परिस्थितीत कायम तुझ्यासोबत असेन. अनुष्काने लिहिलेली ही एकच ओळ आहे मात्र त्या ओळीची प्रचंड चर्चा सोशल मीडियावर होते आहे. अनुष्काच्या या पोस्टवर वरूण धवन, श्रद्धा कपूर, अथिया शेट्टी, सोनाली बेंद्रे या सगळ्यांनी लाईक्स किंवा कमेंट्स केल्या आहेत. त्याचप्रमाणे विराट आणि अनुष्काच्या चाहत्यांनीही हार्ट इमोजीज दिले आहेत आणि कमेंटही केल्या आहेत.

‘तुझ्या डोळ्यात अश्रू होते…. ‘ विराट कोहलीसाठी अनुष्का शर्माने लिहिली भावनिक पोस्ट

हे वाचलं का?

    follow whatsapp