विराटच्या कॅप्टन्सीबद्दल पुजारा-रहाणेची जय शहांकडे तक्रार, ‘ती’ घटना ठरली कारणीभूत?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आगामी टी-२० विश्वचषकानंतर विराट कोहलीने आपण टी-२० संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याचं जाहीर केलं. विराटच्या या निर्णयानंतर टीम इंडियात बेबनाव असल्याच्या अनेक चर्चा समोर आल्या. मध्यंतरी प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार विराट कोहली बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना विश्वासात न घेता रोहित शर्माला उप-कर्णधारपदावरुन हटवावं अशी मागणी करुन निवड समितीला भेटला होता. त्याआधी इंग्लंडमध्ये World Test Championship दरम्यान अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या दोन खेळाडूंनी विराटच्या वागणुकीबद्दल जय शहांना तक्रार केल्याचं कळतंय.

New Indian Express ने दिलेल्या बातमीनुसार, WTC Final दरम्यान विराटच्या वागणुकीवर नाराज झालेल्या अजिंक्य आणि पुजाराने जय शहा यांच्याशी चर्चा केली. यानंतर बीसीसीआयने सर्व खेळाडूंचा अभिप्राय मागायचं ठरवलं. हा अभिप्राय आल्यानंतर विराटने आपलं कर्णधारपद सोडल्याचं बोललं जातंय.

टी-२० क्रिकेटमध्ये कोण असेल Virat Kohli चा उत्तराधिकारी? दोन खेळाडूंची नाव चर्चेत

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपमध्ये भारतीय संघाला पराभव स्विकारावा लागल्यानंतर संघात अनेक गोष्टी बदलल्याचं बोललं जातंय. अंतिम सामन्यात भारताचा संघ १७० धावांत कोलमडला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या या खराब कामगिरीनंतर आपल्या खराब फॉर्ममुळे चर्चेत असलेल्या पुजारा आणि रहाणे यांना बोलावून घेत कोहलीने ड्रेसिंग रुममध्ये त्यांना चार शब्द सुनावत मस्करी केली. ज्यामुळे नंतर मोठा वाद निर्माण झाला.

14 टी-20, 3 वन-डे आणि 4 टेस्ट मॅच, BCCI कडून 2021-22 च्या हंगामासाठीचं वेळापत्रक जाहीर

ADVERTISEMENT

यानंतर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी बीसीसीआयचे सचिव जय शहा यांना फोन करुन घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली. अंतिम सामना संपल्यानंतर इंग्लंड दौरा सुरु होण्याआधी टीम इंडियात या घडामोडी घडत होत्या. यावेळी बीसीसीआयने सर्व खेळाडूंकडून विराटच्या कॅप्टन्सीबद्दलचा अभिप्राय मागवून इंग्लंड दौरा संपल्यानंतर पाऊल उचलायचं ठरवलं असं कळतंय. विराटने टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला असला तरीही टी-२० विश्वचषकानंतर बीसीसीआय विराटच्या वन-डे कॅप्टन्सीबद्दलही निर्णय घेऊ शकते असे संकेत मिळतायत.

ADVERTISEMENT

Virat-Rohit मधला अंतर्गत वाद कॅप्टन्सी सोडण्यासाठी कारणीभूत? कोहलीच्या ‘त्या’ मागणीवर BCCI नाराज

    follow whatsapp

    ADVERTISEMENT