Ind vs Eng T20I Series : भारताच्या गब्बरसमोर आव्हानांचं ‘शिखर’
टेस्ट सिरीजमध्ये ३-१ ने बाजी मारल्यानंतर टीम इंडिया आता सज्ज झाली आहे ती म्हणजे टी-२० सिरीजसाठी. नरेंद्र मोदी मैदानावर आजपासून ५ सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. टी-२० आणि वन-डे सिरीजसाठी टीम इंडियाच्या व्हाईट बॉल स्पेशालिस्टनी संघात पुनरागमन केलंय. वर्षाअखेरीस भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपचा विचार केला असता शिखर धवनला भारतीय संघात आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नांची […]
ADVERTISEMENT

टेस्ट सिरीजमध्ये ३-१ ने बाजी मारल्यानंतर टीम इंडिया आता सज्ज झाली आहे ती म्हणजे टी-२० सिरीजसाठी. नरेंद्र मोदी मैदानावर आजपासून ५ सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. टी-२० आणि वन-डे सिरीजसाठी टीम इंडियाच्या व्हाईट बॉल स्पेशालिस्टनी संघात पुनरागमन केलंय. वर्षाअखेरीस भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपचा विचार केला असता शिखर धवनला भारतीय संघात आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्मा लिमीटेड ओव्हर सिरीज खेळला नाही. तिकडे शिखर धवन आणि लोकेश राहुलने ओपनिंग केली. पण रोहित शर्मा आता फिट झालाय आणि पुन्हा संघात परतलाय त्यामुळे ओपनिंगसाठी त्याचं नाव हे साहजिकच पहिल्यांदा घेतलं जाईल. मग प्रश्न तयार होतो की रोहितची साथ द्यायची कोणी?? शिखर धवन की लोकेश राहुल….आता वन-डे क्रिकेटचा विचार केला तर रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीने याआधीही ओपनिंग केलंय आणि त्यांची कामगिरीही चांगली होत आलीये. पण जिकडे गोष्ट टी-२० क्रिकेटची येते तिकडे टीम इंडियाच्या गब्बरचे आकडे काहीसे चिंताजनक आहेत.
टी-२० क्रिकेटमध्ये शिखर धवनचा फॉर्म हा म्हणावा तसा नाहीये. कामगिरीत सातत्य नसणं हे टी-२० क्रिकेटमध्ये शिखर धवनसाठी मारक ठरतंय. त्यामुळे आजपासून जी टी-२० सिरीज सुरु होणार आहे तिकडेही टीम इंडियाचं मॅनेजमेंट शिखर धवन ऐवजी लोकेश राहुलला ओपनिंगसाठी चान्स देऊ शकतं. त्यामुळे यापुढची परिस्थिती गब्बरसाठी करो या मरो अशी असणार आहे.
आता शिखर आणि लोकेश राहुलची आकडेवारी काय सांगते हे आपण पाहूया….