Glenn Maxwell च्या द्विशतकाची कमाल! अफगाणिस्तानच्या हाता-तोंडाशी आलेला विजय आणला खेचून
या सामन्यातील विजयाचा खरा स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल राहिला.त्याने दुखापतग्रस्त असतानाही शानदार द्विशतक झळकावून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
ADVERTISEMENT

Australia vs Afghanistan: वर्ल्ड कप-2023 च्या 39 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने शानदार विजय मिळवला. त्यांनी अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 46.5 षटकात 7 गडी गमावून 292 धावांचे लक्ष्य पूर्ण केले. या सामन्यात तर ग्लेन मॅक्सवेलने द्विशतक झळकावत साऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. या सामन्यात तो 201 धावांवर नाबाद राहिला. या सामन्यातील विजयाचा खरा स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल राहिला. त्याने दुखापतग्रस्त असतानाही शानदार द्विशतक झळकावून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
‘मॅक्सवेल’ची तुफानी खेळी
अफगाणिस्तानला या सामन्याचा विजय अगदी सोपा वाटत होता. मात्र यादरम्यान मॅक्सवेललाही या सामन्यात दोन तीन वेळा मोठे जीवदान मिळाले. त्याचा फायदा घेत त्याने तुफानी खेळी खेळत अफगाणिस्तानच्या हातात असणारा विजय त्याने अगदी सहज हिसकावून घेतला. मॅक्सवेलने कर्णधार पॅट कमिन्सच्या साथीने 8 व्या विकेटसाठी 170 चेंडूत 202 धावांची नाबाद भागिदारी केली.
मॅक्सवेलला दुखापत तरीही स्टार
यावेळी मॅक्सवेलला पाठदुखीचाही त्रास झाला होता, तरीही त्याने शानदार द्विशतक झळकावत अनेकांना मोठा धक्का दिला. त्याचबरोबर हॅमस्ट्रिंगलाही गंभीर दुखापत झाली, पण मॅक्सवेलने या विश्वकपमध्ये सगळे सामने त्याने लंगडत असले तरी मोठ्या हिमतीने खेळले होते. पाठदुखीचा त्रास असतानाही तो मैदानाबाहेर गेला नाही. जबरदस्त असा उत्साह दाखवत त्याने आपल्या संघाला जोरदार विजय मिळवून दिला आणि उपांत्य फेरीत घेऊन गेला आहे.
हे ही वाचा >> मृतदेहासोबत केला 600 Km प्रवास, प्रवाशांनी भीत भीत काढली रात्र
खेळी षटकार आणि चौकाराची
या सामन्यात अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 292 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात 5 वेळचा चॅम्पियन असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने 7 विकेट्स गमावून सामना जिंकला. ग्लेन मॅक्सवेलने संघाकडून 128 चेंडूत 201 धावांची नाबाद खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 10 षटकार आणि 21 चौकार मारले. तर पॅट कमिन्सने 68 चेंडूत नाबाद 12 धावा केल्या आहेत.