Ind Vs ban Test Series : बांग्लादेशचं स्वप्न भंगलं; भारतानं मिरपूर टेस्टसह मालिकाही जिंकली

मुंबई तक

बांगलादेशविरुद्धची मीरपूर कसोटीही भारताने जिंकली आहे. सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारत हा सामना गमावू शकतो असे वाटत होते, परंतु श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विनच्या भागीदारीने टीम इंडियाला सावरलं आणि भारताने हा सामना 3 विकेटने जिंकला. यासह टीम इंडियाने मालिका 2-0 ने जिंकली आहे. टीम इंडियाच्या या विजयाचे हिरो होते रविचंद्रन अश्विन आणि श्रेयस अय्यर, ज्यांनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बांगलादेशविरुद्धची मीरपूर कसोटीही भारताने जिंकली आहे. सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारत हा सामना गमावू शकतो असे वाटत होते, परंतु श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विनच्या भागीदारीने टीम इंडियाला सावरलं आणि भारताने हा सामना 3 विकेटने जिंकला. यासह टीम इंडियाने मालिका 2-0 ने जिंकली आहे. टीम इंडियाच्या या विजयाचे हिरो होते रविचंद्रन अश्विन आणि श्रेयस अय्यर, ज्यांनी संघाला संकटातून बाहेर काढले आणि अखेरीस सामना जिंकला.

या सामन्यात बांगलादेशने भारताला 145 धावांचे लक्ष्य दिले होते. टीम इंडियाने चौथ्या दिवसाची सुरुवात 45-4 अशा स्कोअरने केली होती, पण बघता बघता सकाळच्या सेशनमध्ये 3 विकेट गेले. अशा स्थितीत भारतावर पराभवाचे संकट ओढावले होते. अखेरीस श्रेयस अय्यर (29 धावा), रविचंद्रन अश्विन (42 धावा) यांच्या अर्धशतकी भागीदारीने (71 धावा) बांगलादेशचे स्वप्न भंगले.

भारतीय विकेट्स –

1- 3: केएल राहुल

2-12 : चेतेश्वर पुजारा

हे वाचलं का?

    follow whatsapp