शेन वॉर्नने असा काय Whatsapp मेसेज पाठवला की, मॉडेल प्रचंड भडकली?

मुंबई तक

जगातील सर्वात महान स्पिनर्सपैकी एक असलेला ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न हा नेहमीच वादात अडकत आला आहे. आता तो पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या वादात अडकला आहे. यावेळी त्याच्यावर मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्री जेसिका पावर हिने अश्लील मेसेज पाठविल्याचा गंभीर आरोप केला आहे. 52 वर्षीय वॉर्नच्या या प्रकारमुळे जेसिकाने त्याला विक्षिप्त असं संबोधलं आहे. याआधीही वॉर्न आपल्या अशाच […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

जगातील सर्वात महान स्पिनर्सपैकी एक असलेला ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न हा नेहमीच वादात अडकत आला आहे. आता तो पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या वादात अडकला आहे.

यावेळी त्याच्यावर मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्री जेसिका पावर हिने अश्लील मेसेज पाठविल्याचा गंभीर आरोप केला आहे.

52 वर्षीय वॉर्नच्या या प्रकारमुळे जेसिकाने त्याला विक्षिप्त असं संबोधलं आहे.

याआधीही वॉर्न आपल्या अशाच प्रकारच्या कृत्यांमुळे वादात सापडत आला आहे. ज्यामुळे त्याचं लग्न देखील मोडलं.

जेसिकाने शेन वॉर्नने पाठवलेल्या मेसेजचाच स्क्रीनशॉट यावेळी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

ज्यामध्ये वॉर्नकडून जेसिकाला हॉटेलच्या रुमवर भेटण्याबाबत विचारणा होत होती.

जेसिकाने केलेल्या आरोपानुसार, ‘मी नकार दिला त्यानंतरही वॉर्नकडून सतत मेसेज येतच होते.’ असं तिने म्हटलं आहे.

30 वर्षीय जेसिकाने म्हटलं आहे की, वॉर्न हा सतत तशाच स्वरुपाचे मेसेज करत होता.

ब्रिग ब्रदर या रियालिटी शोमध्ये सहभागी झालेली जेसिका म्हणाली की, वॉर्न हा सतत अडचणीत येणार आहे.

जेसिकाने असंही म्हटलंय की, तिने वॉर्नला हे देखील सांगितले की, तो तिच्या वडिलांच्या वयाच्या आहेत

दरम्यान, जेसिकाने जे आरोप केले आहेत त्यानंतर अद्याप तरी शेन वॉर्नकडून कोणतंही स्पष्टीकरण आलेल नाही.

दरम्यान, आता याबाबत जेसिका काही कारवाईची भूमिका घेणार का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, अशाच काही प्रकारांमुळे शेन वॉर्नला त्याची पत्नी सोडून गेली. अफेअर आणि सेक्स स्कँडल यामुळे त्याचं लग्न मोडलं.

जेसिकाच्या आरोपांआधी अशाच प्रकारामुळे शेन वॉर्नला त्याची पत्नी सोडून गेली. अफेअर आणि सेक्स स्कँडल यामुळे त्याचं लग्न मोडलं.

वॉर्नने ऑस्ट्रेलियासाठी 300 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याला जगातील महान लेग स्पीनर म्हटलं जातं.

टेस्ट क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 708 विकेट्स आहेत. तर वनडेमध्ये त्याच्या नावावर 293 विकेट्स आहेत.

जेसिकाने केलेल्या आरोपानंतर ऑस्ट्रेलियात मात्र, याप्रकरणी बरीच उलटसुलट चर्चाही सुरु झाली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp