"राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एकत्र येण्याचा निर्णय आता...", शरद पवार नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रवादीच्या च्या भवितव्याबद्दल विचारलं असता, शरद पवार यांनी सांगितलं होतं की, पक्षात दोन विचाराचे लोक आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

शरद पवार ऑफ द रेकॉर्ड काय बोलले?

दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का?
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यानं राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्न आता यानंतर निर्माण झाला आहे. शरद पवार यांनी ऑफ द रेकॉर्ड बोलताना याबद्दलचं मत मांडल्याची माहिती आहे. जर एनसीपीचे दोन्ही गट एकत्र आले तर त्यात आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. याबाबतचा अंतिम निर्णय पुढील पिढीच्या नेत्यांनीच घ्यायचा आहेृ असं पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले, "सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकत्र येण्याबाबतचा निर्णय घ्यावा. दोन्ही गटांची विचारधारा जवळपास एकसारखीच आहे. मी स्वतःला या प्रक्रियेतून बाहेर ठेवतोय."
पक्षात दोन विचारधारा - शरद पवार
एनसीपी (SP) च्या भवितव्याबद्दल विचारलं असता, शरद पवार यांनी 'इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होतं की, "पक्षात दोन विचार आहेत. एक म्हणजे, आपण पुन्हा एकत्र यावं. दुसरा म्हणजे, पक्षाचे काही लोक थेट भाजपसोबत जाऊ इच्छित नाही. इंडिया आघाडीला पुन्हा मजबूत करावं असं त्यांना वाटतं."
हे ही वाचा >> मसूद अजहरच्या घरी मृतदेहांची रांग! ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानातील 'ते' भयानक फोटो आले समोर
शरद पवार पुढे म्हणाले की, इंडिया आघाडी सध्या सक्रिय नाही. त्यामुळे आपल्या पक्षाला पुन्हा संघटित करावं लागेल. पक्षाची पुनर्बांधणी करावी लागेल. तरुणांना सामील करून घ्यावं लागेल आणि कामाला लागावं लागेल. माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी स्पष्ट केलं की, आमचा विचार विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचा आहे. भाजपला पर्याय म्हणून विश्वासार्ह शक्ती निर्माण करायची आहे.