CSK vs GT : गुजरात टायटन्सला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू झाला दुखापतग्रस्त

मुंबई तक

ADVERTISEMENT

kane williamson injured
kane williamson injured
social share
google news

kane williamson injured : आयपीएलच्या 16 व्या हंगामाच्या पहिल्या सामन्यात हार्दीक पंड्याला मोठा धक्का बसला आहे. गुजरात टायटन्सचा अनुभवी बॅट्समन केन विल्यमसन (kane williamson) दुखापतग्रस्त झाला आहे.फिल्डींग करताना त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे सामना अर्ध्यातच सोडून त्याला बाहेर पडावे लागले होते. दरम्यान चेन्नईने 179 धावा केल्या आहेत. आता चेन्नईचे हे 179 धावांचे आव्हान गुजरात पुर्ण करते की चेन्नई त्यांना रोखण्यात यशस्वी ठरते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.(csk vs gt kane williamson injures during fielding hardik pandya gujrat titans)

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये (Chennai Super Kings) आयपीएलच्या 16 व्या सीजनमधला पहिला सामना खेळवला जातोय. या पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आहे. गुजरात संघाच्या 13 व्या ओव्हर दरम्यान संघाला झटका बसला. गुजरातचा स्टार खेळाडू आणि न्युझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन फिल्डींग करताना दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले.दरम्यान त्याला झालेली दुखापत किती गंभीर आहेत याची माहिती मिळू शकली नाही.

गुजरातला 179 धावांचे आव्हान

गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दीक पंड्याने टॉस जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. चेन्नईची सुरुवात चांगली झाली नव्हती.कारण डेवोन कॉन्वे 1 धावा करून आऊट झाला. मोहम्मद शमीच्या भेदक गोलंदाजीसमोर त्याचा निभाव लागला आणि तो क्लीन बोल्ड झाला. कॉन्वे नंतर मोईन अली मैदानात आला. त्याने मैदानात डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तो 23 धावा करून तो बाद झाला.या खेळीत त्याने 4 फोर आणि 1 सिक्स लगावला आहे. एकीकडे एका बाजूने विकेट पडत असताना दुसरीकडे ऋतुराज गायकवाडने (Ruturaj gaikwad) दुसऱ्या बाजूने त्याने डाव सावरला होता. ऋतुराज गायकवाडने (Ruturaj gaikwad) तुफान हाफ सेंच्यूरी ठोकली होती. त्यानंतर तो शतकाच्या दिशेने होता. एका पॉईंटला तो शकत ठोकेल असे फॅन्सना वाटत होते. पण 92 धावावर तो आऊट झाला. त्याने या 92 धावांच्या खेळीत 9 षटकार आणि 4 चौकार लगावले आहे. त्याच्या विकेटनंतर एकाही खेळाडूला मैदानात साजेशा धावा करता आल्या नाही. बेन टोक्स 7, अम्बाती रायडू 12, शिवम दुबे 19 तर रविंद्र जडेजा 1 धावाकरून आऊट झाला. महेंद्र सिंह 14 धावा करून नाबाद राहीला. दरम्यान गुजरात टायटन्सकडून मोहम्मद शमी,राशीद खान, अल्झारी जोसेफने प्रत्येकी 2,आणि जोशूआ लिटलने 1 विकेट घेतली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : ऋतुराज गायकवाडची बॅट तळपली, IPLच्या पहिल्याच सामन्यात ठोकली हाफ सेंच्यूरी

ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj gaikwad) 92 धावांच्या जोरावर चेन्नई 178 धावांचा डोंगर उभारू शकली आहे. आता गुजरात टायटन्ससमोर 179 धावांचे आव्हान असणार आहे. आता चेन्नईचे सुपर किंग्जचे बॉ़लर गुजरात 178 धावात रोखण्यात यशस्वी ठरतात की गुजरात पहिल्या विजयाची नोंद करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT