जो रुटची तूफान फलंदाजी, सचिनचा रेकॉर्ड धोक्यात?; दिग्गज कर्णधाराचा मोठा दावा
कसोटी क्रिकेटमध्ये जो रुटच्या फलंदाजीचा जलवा कायम आहे. इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज आताच्या काळात कसोटी क्रिकेटचा बादशहा बनला आहे. जो रुटने आपल्या १० हजार धावांचा टप्पा देखील पूर्ण केला आहे. कसोटी क्रिकेटचा विषय चर्चेला घेतला असता, जो रुटचे नाव अव्वल स्थानावर घेतलं जातं. सध्या न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्ये (ENG vs NZ) कसोटी मालिका सुरु आहे. मागच्या सामन्यात […]
ADVERTISEMENT

कसोटी क्रिकेटमध्ये जो रुटच्या फलंदाजीचा जलवा कायम आहे. इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज आताच्या काळात कसोटी क्रिकेटचा बादशहा बनला आहे. जो रुटने आपल्या १० हजार धावांचा टप्पा देखील पूर्ण केला आहे.
कसोटी क्रिकेटचा विषय चर्चेला घेतला असता, जो रुटचे नाव अव्वल स्थानावर घेतलं जातं. सध्या न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्ये (ENG vs NZ) कसोटी मालिका सुरु आहे. मागच्या सामन्यात जो रुटने (Joe Root) जबरदस्त शतक ठोकत इंग्लंडच्या संघाला ५ विकेटने विजय मिळवून दिला.
या शतकाबरोबरच जो रुटने १० हजार धावांचा टप्पा देखील पूर्ण केला. रुटच्या या कामगिरीने सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम धोक्यात आला आहे.
सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) कसोटीमध्ये १५, ९२१ धावा केल्या आहेत. आता किक्रेट विश्वात चर्चा रंगली आहे की, जो रुट सचिनचा हा रेकॉर्ड अगदी सहज तोडू शकतो. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलरने ही भविष्यवाणी केली आहे. तो म्हणाला की ‘जो रुटचा फॉर्म, फिटनेस पाहता तो सचिनचा रेकॉर्ड अगदी सहज तोडू शकतो.’