Ind vs Eng : चेन्नईत फॅन्सकडून बायो बबल मोडण्याचा प्रयत्न

मुंबई तक

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये एक अनपेक्षित प्रकार घडला आहे. दुसऱ्या टेस्टसाठी तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने ५० टक्के फॅन्सना मैदानावर संधी दिली आहे. परंतु कोरोनाचे नियम लक्षात घेता प्लेअर्ससाठी बायो बबल तयार करण्यात आलंय. चेन्नईमध्ये तिसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान मॅच पहायला आलेल्या एका फॅनने हे बायो बबल मोडून इंग्लंडच्या प्लेअरला शेकहँड करण्याचा प्रयत्न केला. मॅच […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये एक अनपेक्षित प्रकार घडला आहे. दुसऱ्या टेस्टसाठी तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने ५० टक्के फॅन्सना मैदानावर संधी दिली आहे. परंतु कोरोनाचे नियम लक्षात घेता प्लेअर्ससाठी बायो बबल तयार करण्यात आलंय. चेन्नईमध्ये तिसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान मॅच पहायला आलेल्या एका फॅनने हे बायो बबल मोडून इंग्लंडच्या प्लेअरला शेकहँड करण्याचा प्रयत्न केला.

मॅच पाहण्यासाठी आलेल्या एका तरुण चाहत्याने बॅरीकेडवरुन उडी मारत इंग्लंडच्या प्लेअरसोबत शेकहँड करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराचा व्हिडीओ मैदानावर उपस्थित असलेल्या काही लोकांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

तिसऱ्या दिवशी लंच सेशनदरम्यान मैदानावर असलेल्या या फॅनने उडी मारुन थेट पिचवर धाव घेतली. या तरुण फॅनला थांबवण्यासाठी तिकडे कोणताही पोलीस अधिकारी हजर नव्हता ज्यामुळे या तरुणाने जिकडे इंग्लंडचे प्लेअर प्रॅक्टीस करत होते तिकडे आपला मोर्चा वळवला. इतक्यात मैदानावरील कर्मचाऱ्यांना ही बाब लक्षात आली आणि त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन या तरुण फॅनला मैदानाबाहेर काढलं.

दरम्यान दुसऱ्या टेस्ट मॅचवर भारतीय संघाने आपली पकड मजबूत बसवली असून रविचंद्रन आश्विनचं शतक आणि कॅप्टन विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने भक्कम आघाडी घेतली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp