World Cup 2023: वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया जाहीर, संघातून सॅमसन आऊट
Team India Squad for World Cup 2023: विश्वचषकासाठी आता भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता भारतयी संग वर्ल्ड कप खेळण्यासाठी सज्ज असला तरी संघातील काही महत्वाचे शिलेदार आता बाहेर ठेवण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT

Team India Squad for World Cup 2023: भारतीय क्रिकेट संघ सध्या आशिया कप 2023 खेळण्यात व्यस्त आहे. त्यानंतर आता भारतीय संघाला 2023 चा एकदिवसीय विश्वचषकाला सामोरे जायचे आहे. त्यामुळे बीसीसीआयकडून (BCCI) संघाची घोषणा करण्यात आली आहे. होणारा वर्ल्ड कप ( World Cup 2023) आता रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळला जाणार आहे. भारतीय संघाची निवड झाली असली तरी या टीममध्ये मात्र युजवेंद्र चहलला संधी देण्यात आली नाही. तर आशिया चषकमध्ये ट्रॅव्हल रिझर्व्ह म्हणून संघात असेलला संजू सॅमसनही यादीतून बाहेर ठेवण्यात आले आहे. तर टिळक वर्मालाही संधी मिळालेली नाही. मात्र याचवेळी एकही सामना न खेळलेला केएल राहुलला विश्वचषकात स्थान मिळाले आहे.
एकदिवसीय विश्वचषक 2023 हा 5 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या विश्वचषकामध्ये सलामीचा सामना गतविजेता संघ इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये खेळवला जाणार आहे. मागच्या वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडही इंग्लंडबरोबरच पराभूत झाले होते. तर यावेळी मात्र विश्वचषक स्पर्धेतील विजेततेपदाचा सामना 19 नोव्हेंर रोजी अहमदाबादमध्ये होणार आहे. निवडसमितीत प्रमुख असेलला अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा या दोघांनीच विश्वचषक 2023 साठी टीम इंियाची घोषणा केली आहे.
हे ही वाचा >> IND Vs PAK Asia Cup 2023: इंडिया पाकिस्तानवर करणार हल्लाबोल, आज हे विक्रम होणार…
टीम इंडिया ; रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, मोहम्मद . सिराज, मो. शमी, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर.
केएल राहुलमुळे अनेकांना आश्चर्य ?
या विश्वचषकाची मोठी बातमी म्हणजे केएल राहुल याची संघातील एन्ट्री. त्याला चेन्नईतील 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषक सलामीच्या सामन्यापूर्वी संघात सहभागी होण्यासाठी तो योग्य असल्याचे सांगितले जाते आहे. त्याला काही दिवसापूर्वी त्याच्या मांडीला दुखापत झाली होती. तर आता मात्र तो बेंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. तर श्रीलंकेतील आशिया चषकापूर्वी आगामी सामन्यांमध्ये तो टीम इंडियामध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर दुसरीकडे राहुल संघात आला आहे, आणि संजू सॅमसन बाहेर गेला आहे.