IND vs AUS: रोहित शर्मानं बनवला महारेकॉर्ड, बनला जगातला नंबर वन खेळाडू
नागपूरमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माची धडाकेबाज खेळी पाहायला मिळाली. रोहितने अवघ्या 20 चेंडूत 46 धावा केल्या, ज्यात चार षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. त्याच्या या शानदार खेळीमुळे भारतीय संघ हा सामना सहा गडी राखून जिंकू शकला. या झंझावाती खेळीनंतर रोहित शर्माने एका मोठ्या विक्रमाला गवसनी घातली आहे. 34 वर्षीय […]
ADVERTISEMENT

नागपूरमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माची धडाकेबाज खेळी पाहायला मिळाली. रोहितने अवघ्या 20 चेंडूत 46 धावा केल्या, ज्यात चार षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. त्याच्या या शानदार खेळीमुळे भारतीय संघ हा सामना सहा गडी राखून जिंकू शकला. या झंझावाती खेळीनंतर रोहित शर्माने एका मोठ्या विक्रमाला गवसनी घातली आहे.
34 वर्षीय रोहित शर्माने आता न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलला मागे टाकत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनला आहे. दुसऱ्या टी-20पूर्वी रोहित आणि गुप्टिल दोघांच्या नावावर 172 षटकार नोंदवले गेले होते. रोहित शर्माने भारतीय डावाच्या पहिल्याच षटकात वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडच्या चेंडूवर षटकार ठोकून गप्टिलला मागे टाकले.
आंतरराष्ट्रीय T-20 मध्ये सर्वाधिक षटकार
रोहित शर्मा (IND) – 138 सामने, 176 षटकार
मार्टिन गुप्टिल (NZ) – 121 सामने, 172 षटकार
ख्रिस गेल (WI) – 79 सामने, 124 षटकार
इऑन मॉर्गन (इंग्लंड/आयर्लंड) – 115 सामने, 120 षटकार
अॅरॉन फिंच (AUS) – 94 सामने, 119 षटकार
आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये रोहितच्या नावावर सर्वाधिक धावा
रोहित शर्मा आधीच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. रोहित शर्माने आतापर्यंत 138 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर 32.53 च्या सरासरीने 3,677 धावा आहेत. रोहित शर्माने आत्तापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चार शतके आणि 28 अर्धशतके झळकावली आहेत. या यादीत दुसरा क्रमांक भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा आहे. विराट कोहलीने आतापर्यंत 106 सामन्यांमध्ये 50.66 च्या सरासरीने 3,597 धावा केल्या आहेत ज्यात एक शतक आणि 32 अर्धशतकांचा समावेश आहे.
मार्टिन गुप्टिल सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत मार्टिन गुप्टिल तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुप्टिलने आतापर्यंत 121 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 31.79 च्या सरासरीने 3,497 धावा केल्या आहेत. यादरम्यान गुप्टिलच्या बॅटने दोन शतके आणि 20 अर्धशतके झळकावली आहेत. आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग 3,011 धावांसह चौथ्या तर ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार अॅरॉन फिंच 2,908 धावांसह पाचव्या स्थानावर आहे.
दिग्गज एमएस धोनीनंतर रोहित शर्मा हा T-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणार्या टी-20 विश्वचषक 2022 मध्येही रोहित भारताचे नेतृत्व करणार आहे.
आठ-आठ षटकांचा सामना
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने पुनर्निर्धारित आठ षटकांत पाच बाद 90 धावा केल्या. मॅथ्यू वेडने 43 धावांची नाबाद खेळी खेळली, ज्यात चार चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. दुसरीकडे अॅरॉन फिंचने 31 धावांचे योगदान दिले. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक दोन बळी घेतले. प्रत्युत्तरात भारताने चार चेंडू राखून सामना जिंकला. रोहित शर्माने 46 आणि कोहलीने 11 धावांचे योगदान दिले.