Ind vs Aus: तीन खेळाडूंना आराम? तिसऱ्या वनडेत कशी असेल प्लेईंग 11?
Ind vs aus 3rd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 22 मार्च (बुधवार) रोजी चेन्नई (Chennai) येथे होणार आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात पाच गडी राखून नेत्रदीपक विजय मिळवला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात त्यांना 10 गडी राखून मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता. अशा स्थितीत आता तिसरा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक […]
ADVERTISEMENT

Ind vs aus 3rd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 22 मार्च (बुधवार) रोजी चेन्नई (Chennai) येथे होणार आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात पाच गडी राखून नेत्रदीपक विजय मिळवला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात त्यांना 10 गडी राखून मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता. अशा स्थितीत आता तिसरा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरला असून विजयी संघ वनडे मालिकेवर (ODI Series) कब्जा करेल. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता हा सामना खेळवला जाईल. (Three players relieved? How will the playing be in the third ODI 11)
सूर्यकुमार यादव प्लेइंग-11 मधून बाहेर होणार का?
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही चाहत्यांच्या नजरा भारतीय संघाच्या कॉम्बिनेशनवर असणार आहेत. पहिल्या दोन सामन्यांमध्ये डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कसमोर टीम इंडियाची अव्वल फळी ज्या पद्धतीने कोलमडली, तो चिंतेचा विषय आहे. सूर्यकुमार यादवची कामगिरी खूपच लाजिरवाणी होती. तो दोन्ही सामन्यात पहिल्याच चेंडूवर तो मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. अशा स्थितीत सूर्यकुमारला तिसऱ्या वनडेत संधी मिळते की नाही हे पाहावे लागेल.
रोहित शर्माने सूर्यकुमारला अधिक संधी देण्याचे संकेत दिले आहेत. दुसरा वनडे संपल्यानंतर रोहित म्हणाला होता, ‘श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाबद्दल आम्हाला माहिती नाही. श्रेयसची जागा रिक्त आहे, त्यामुळे आम्ही सूर्यालाच मैदानात उतरवू. ज्यांच्याकडे क्षमता आहे त्यांना संधी मिळेल, असे मी अनेकदा सांगितले आहे. सूर्याला माहित आहे की त्याला वनडेतही चांगली कामगिरी करावी लागणार आहे. सक्षम खेळाडूंना पुरेशा संधी दिल्या गेल्या नाहीत असे कधीच वाटू नये. शेवटच्या दोन सामन्यांमध्ये तो लवकर बाद झाला पण त्याला सलग सात आठ किंवा दहा सामने द्यावे लागतील, असं रोहित म्हणाला.