Ind vs SL 2nd Test: शिकार टप्प्यात.. टीम इंडिया उद्याच करणार लंकेचा करेक्ट कार्यक्रम?
Ind vs SL 2nd Test: बंगळुरु येथे खेळल्या जात असलेल्या डे-नाईट कसोटी सामन्यावर भारताची पकड मजबूत झाली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने दुसऱ्या डावात एका विकेट गमावून 28 धावा केल्या होत्या. कुसल मेंडिस 16 आणि दिमुथ करुणारत्ने 10 धावांवर खेळत आहेत. श्रीलंकेला अजूनही विजयासाठी 419 धावांची गरज आहे, जी अगदीच अशक्य गोष्ट वाटत आहे. […]
ADVERTISEMENT

Ind vs SL 2nd Test: बंगळुरु येथे खेळल्या जात असलेल्या डे-नाईट कसोटी सामन्यावर भारताची पकड मजबूत झाली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने दुसऱ्या डावात एका विकेट गमावून 28 धावा केल्या होत्या. कुसल मेंडिस 16 आणि दिमुथ करुणारत्ने 10 धावांवर खेळत आहेत. श्रीलंकेला अजूनही विजयासाठी 419 धावांची गरज आहे, जी अगदीच अशक्य गोष्ट वाटत आहे. तर भारताला विजयासाठी आणखी 9 विकेट्सची गरज आहे.
दुसऱ्या डावात श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर लाहिरू थिरिमाने क्लीन बोल्ड झाला. त्याला पहिल्या डावात टीम इंडियाचा हिरो जसप्रीत बुमराहने बाद केलं. थिरिमानेला आपलं खातेही उघडता आले नाही.
भारताने 303/9 वर दुसरा डाव केला घोषित
भारतीय संघाने आपला दुसरा डाव नऊ बाद 303 धावांवर घोषित केला. त्यामुळे श्रीलंकेला 447 धावांचं प्रचंड मोठं लक्ष्य मिळालं आहे. भारताकडून दुसऱ्या डावात श्रेयस अय्यरने 67 आणि ऋषभ पंतने 50 धावांचे योगदान दिले. पंतने अवघ्या 28 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हा कसोटी क्रिकेटमधील भारतीय विक्रम आहे.