IPL 2022 चा हंगाम भारतात की UAE मध्ये? जय शहा म्हणतात...

आगामी हंगामासाठीचं Mega Auction लवकरच पार पडणार
IPL 2022 चा हंगाम भारतात की UAE मध्ये? जय शहा म्हणतात...
फोटो सौजन्य - आयपीएल

अखेरीस बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी आज याबद्दल घोषणा केली आहे. आयपीएलचा आगामी हंगाम हा भारतात खेळवला जाणार असून दोन नवीन संघांच्या येण्यामुळे ही स्पर्धा अधिकच उत्कंठावर्धक होईल असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.

आयपीएल २०२१ चा सुरुवातीचा हंगाम बीसीसीआयने भारतातच खेळवला होता. परंतू बायो सिक्युअर बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर बीसीसीआयने ही स्पर्धा स्थगित केली. यानंतर उर्वरित हंगाम बीसीसीआयने युएईत खेळवण्याचा निर्णय घेतला.

चेन्नईने या हंगामाचं विजेतेपद मिळवलं असून, आगामी हंगामासाठी दोन संघांचा लिलाव युएईत पार पडला. ज्यात संजीव गोएंका यांच्या ग्रूपने लखनऊ तर CVC Capitals ग्रूपने अहमदाबाद संघ विकत घेतला आहे. लवकरच आगामी हंगामासाठीचं Mega Auction पार पडणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in