IPL 2021 मध्ये पंजाबच्या खेळाडूकडून मॅच फिक्सींग? BCCI च्या अँटी करप्शन युनिटकडून तपासाला सुरुवात
आयपीएलमध्ये मंगळवारी पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघाचा सामना पार पडला. शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या या सामन्यात राजस्थानने पंजाबच्या हातातला विजयाचा घास हिसकावून २ धावांनी बाजी मारली. परंतू या सामन्यात पंजाबच्या खेळाडूवर आता कारवाईची टांगती तलवार आहे. पंजाब संघाचा खेळाडू दिपक हुडाने सामन्याला सुरुवात होण्याआधी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पंजाबच्या संघाची जर्सी आणि हेल्मेट घातलेला एक फोटो […]
ADVERTISEMENT

आयपीएलमध्ये मंगळवारी पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघाचा सामना पार पडला. शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या या सामन्यात राजस्थानने पंजाबच्या हातातला विजयाचा घास हिसकावून २ धावांनी बाजी मारली. परंतू या सामन्यात पंजाबच्या खेळाडूवर आता कारवाईची टांगती तलवार आहे.
पंजाब संघाचा खेळाडू दिपक हुडाने सामन्याला सुरुवात होण्याआधी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पंजाबच्या संघाची जर्सी आणि हेल्मेट घातलेला एक फोटो पोस्ट करत त्याला Here We Go अशी कॅप्शन दिली.
दीपक हुडाची हीच पोस्ट आता चर्चेचा विषय ठरली आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात दीपक हुडा पंजाबच्या प्लेइंग ११ मध्ये होता. सामन्याला सुरुवात होण्याआधी दीपकच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अशी पोस्ट येणं म्हणजे फिक्सींग करणाऱ्या लोकांना एका प्रकारचा संदेश देण्यासारखं असल्याचं बोललं जात आहे.
धक्कादायक ! IPL च्या गोटात पुन्हा Corona चा शिरकाव, SRH च्या टी. नटराजनचा रिपोर्ट पॉजिटीव्ह