मुंबई इंडियन्सला मोठा झटका, जोफ्रा आर्चर IPLमधून बाहेर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Jofra Archer Ruled Out ipl :
Jofra Archer Ruled Out ipl :
social share
google news

Jofra Archer Ruled Out ipl : आयपीएलमध्ये आज 54 वा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्ध (Royal Challengers Bengluru) खेळवला जाणार आहे. या सामन्यापुर्वी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. कारण मुंबईचा स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer)आयपीएलमधून बाहेर झाला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सला मोठा झटका बसला आहे. (jofra archer ruled out ipl 2023 chris jordan replce injured jofra mumbai indians)

आयपीएल सुरू झाल्यापासून जोफ्रा आर्चरला (Jofra Archer) प्रत्येक सामन्यात खेळता येत नव्हते. जोफ्रा आर्चर दुखापतीचा देखील सामना करत होता. मात्र आता जोफ्रा आर्चर आयपीएलमधूनच बाहेर झाला आहे. जोफ्रा आर्चर आता इंग्लंडला जाणार आहे. आर्चरच्या रिकव्हरीवर आता इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे लक्ष असणार आहे.

‘या’ खेळाडूला मिळणार संधी

जोफ्रा आर्चरच्या (Jofra Archer) जागी मुंबई इंडियन्स वेगवान गोलंदाज क्रिस जॉर्डनला संघात संधी देणार आहे. जॉर्डन यंदाचा लिलावात अनसोल्ड राहीला होता. मात्र आता त्याला 2 करोडच्या बेस किमतीवर खरेदी केले आहे. याआधी क्रिस जॉर्डन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैद्राबाद, पंजाब किंग्स आणि चैन्नई सुपर किंग्स संघातून खेळला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आयपीएल कारकीर्द

34 वर्षाच्या क्रिस जॉर्डनने (chris jordan) आतापर्यंत आयपीएलमध्ये 28 सामने खेळले आहेत. यामध्ये क्रिस जॉर्डनने 27 विकेट घेतले आहेत. या दरम्यान सरासरी 30.85 आणि इकॉनॉमी 9.32 होती. जॉर्डनने 2022 मध्ये शेवटचा आयपीएल सामना चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे.

दुखापतीचे ग्रहण

मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या सुरुवातीपासूनच दुखापतीचे ग्रहण लागले आहे. जसप्रीत बुमराह आधीच आयपीएलमधून बाहेर झाला होता. यानंतर झाय रिचर्डसन आणि जोफ्रा आर्चर बाहेर झाला आहे. जॉर्डनकडे आयपीएलचा चांगला अनुभव आहे. फेब्रुवारी महिन्यात जॉर्डन ILT20 खेळला होता. या स्पर्धेत तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. जॉर्डनने 10 सामन्यात 20 विकेट घेतल्या होत्या. या दरम्यान त्याची सरासरी 13.80 इतकी होती. तसेच गेल्या महिन्यात त्याने बांग्लादेशविरूद्ध तीन टी20 सामने देखील खेळले होते.

ADVERTISEMENT

दरम्यान आजच्या बंगळुरु विरूद्धच्या सामन्यात क्रिस जॉर्डन (chris jordan) संधी मिळाली आहे. या संधीचा तो किती फायदा घेतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT