‘माझ्या मुलीने त्यावेळी भारताचा झेंडा फडकवला होता,’ शाहिद आफ्रिदीचा मोठा दावा

मुंबई तक

आशिया चषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन रोमांचक सामने झाले. दोन्ही संघ पहिल्यांदा जेव्हा आमनेसामने आले तेव्हा हार्दिक पंड्याच्या अष्टपैलू खेळामुळे भारताने पाच विकेट्सने विजय मिळवला. दुसरीकडे, सुपर फोरच्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 5 गडी राखून पराभव केला. आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. शाहिद आफ्रिदीने म्हटले आहे की, […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आशिया चषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन रोमांचक सामने झाले. दोन्ही संघ पहिल्यांदा जेव्हा आमनेसामने आले तेव्हा हार्दिक पंड्याच्या अष्टपैलू खेळामुळे भारताने पाच विकेट्सने विजय मिळवला. दुसरीकडे, सुपर फोरच्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 5 गडी राखून पराभव केला.

आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. शाहिद आफ्रिदीने म्हटले आहे की, त्याच्या लहान मुलीने 4 सप्टेंबरला भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान भारताचा झेंडा फडकावला होता. आफ्रिदीने समा टीव्हीला सांगितले की, त्याचे कुटुंबीय सामना पाहण्यासाठी 4 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर गेले होते. त्याला त्याच्या पत्नीने सांगितले होते की, सामना पाहण्यासाठी आलेले 90 टक्के चाहते हे भारतीय समर्थक होते.

शाहिद आफ्रिदी म्हणाला, ‘होय मला कळले की तिथे जास्त भारतीय चाहते आहेत. माझे कुटुंब तिथे बसले होते. मला व्हिडिओ पाठवले जात होते जे मी पाहत होतो. माझी पत्नी मला सांगत होती की इथे फक्त 10 टक्के पाकिस्तानी आहेत, बाकीचे 90 टक्के भारतीय आहेत. पाकिस्तानचा झेंडाही तिथे उपलब्ध नव्हता, त्यामुळे माझी धाकटी मुलगी भारताचा झेंडा फडकावत होती. माझ्याकडे व्हिडिओ आहेत. ट्विट करावे की नाही, असा प्रश्न पडला होता.

शाहिद आफ्रिदी अनेकदा सापडला आहे वादात

हे वाचलं का?

    follow whatsapp