Rohit Pawar महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष; किरण सामंत उपाध्यक्षपदी

मुंबई तक

पुणे : आजोबा शरद पवार यांच्या पावलावर पाऊल टाकत नातू रोहित पवार यांनीही क्रिकेटच्या राजकारणात उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. रोहित पवार क्लब गटातून विजयी झाले असून ते आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सदस्य बनले आहेत. तर उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पुणे : आजोबा शरद पवार यांच्या पावलावर पाऊल टाकत नातू रोहित पवार यांनीही क्रिकेटच्या राजकारणात उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. रोहित पवार क्लब गटातून विजयी झाले असून ते आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सदस्य बनले आहेत. तर उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.

पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर १६ सदस्यीय कमिटीची आज (रविवारी) दुपारी एक बैठक पार पडली. याच बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. रोहित पवार यांच्याविरोधात कोणीही अर्ज भरला नाही, त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. तर उपाध्यक्षपदी किरण सामंत यांची निवड झाली. त्यामुळे आजोबा शरद पवारांनंतर आता रोहित पवारांचीही आता क्रिकेटच्या मैदानात दमदार एन्ट्री झाली आहे.

अध्यक्ष आणि उपाध्यक्षांशिवाय महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या इतर पदाधिकाऱ्यांचीही निवड आज करण्यात आली. यात सचिवपदी शुभेंद्र भंडारकर, सहसचिवपदी संतोष बोबडे आणि खजिनदारपदी संजय बजाज यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शिवसेना (UBT) पक्षाचे सचिव आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अॅपेक्स काऊंन्सिल मेंबर मिलिंद नार्वेकर यांनी या सर्वांचे ट्विट करुन अभिनंदन केले आणि सर्वांना शुभेच्छाही दिल्या.

हे वाचलं का?

    follow whatsapp