आश्विनचा हरभजनला धोबीपछाड, होमग्राऊंडवर अनोख्या विक्रमाची नोंद

मुंबई तक

चेन्नईच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाने भेदक मारा करत मॅचवर आपला ताबा मिळवला आहे. पहिल्या इनिंगमध्ये भारताचा डाव ३२९ रन्सवर संपवण्यात इंग्लंडला यश आलं. यानंतर पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडण्यात भारताला यश आलं. दुसऱ्या दिवशी टी-सेशनपर्यंत इंग्लंडची अवस्था भारतीय बॉलर्सनी ८ बाद १०६ अशी करुन ठेवली. अवश्य वाचा – चेन्नई टेस्टमध्ये झालेला […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

चेन्नईच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाने भेदक मारा करत मॅचवर आपला ताबा मिळवला आहे. पहिल्या इनिंगमध्ये भारताचा डाव ३२९ रन्सवर संपवण्यात इंग्लंडला यश आलं. यानंतर पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडण्यात भारताला यश आलं. दुसऱ्या दिवशी टी-सेशनपर्यंत इंग्लंडची अवस्था भारतीय बॉलर्सनी ८ बाद १०६ अशी करुन ठेवली.

अवश्य वाचा – चेन्नई टेस्टमध्ये झालेला हा अनोखा रेकॉर्ड तुम्हाला माहिती आहे का?

होम ग्राऊंडवर खेळताना रविचंद्रन आश्विनने हरभजन सिंहला मागे टाकत मानाच्या यादीत दुसरं स्थान पटकावलं आहे. भारतात खेळत असताना सर्वाधिकक टेस्ट विकेट घेणाऱ्या बॉलर्सच्या यादीत आश्विन आता दुसऱ्या स्थानावर आला आहे. त्याने हरभजन सिंहचा २६५ विकेट्सचा विक्रम मोडला आहे.

बॉलर्सना मदत करणाऱ्या चेन्नईच्या ट्रॅकवर इंग्लंडचे बॅट्समन अपयशी ठरले. रोरी बर्न्स, डोम सिबले, जो रुट यांना झटपट आऊट करण्यात भारतीय बॉलर्सना यश आलं. यानंतर ठराविक अंतराने इंग्लंडचे बॅट्समन आऊट होत गेले. वर्ल्ड टेस्ट चँपिअनशीपच्या अंतिम फेरीत खेळण्यासाठी भारतीय संघाला या सिरीजमध्ये उर्वरित सामन्यात विजय मिळवणं गरजेचं आहे. त्यामुळे चेन्नई टेस्ट मॅचच्या उर्वरित दिवसांत भारतीय संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp