SA vs IND : राहुलच्या शतकाने संपवला भारताचा दक्षिण आफ्रिकेतला १४ वर्षांचा वनवास
दक्षिण आफ्रिका दौऱ्याला भारतीय संघाने धडाकेबाज सुरुवात केली आहे. व्हाईस कॅप्टन पदावर प्रमोशन झालेल्या लोकेश राहुलने पहिल्याच कसोटी सामन्यात खणखणीत शतक झळकावत आपली निवड सार्थ ठरवली आहे. लोकेश राहुलच्या या शतकामुळे दक्षिण आफ्रिकेत तब्बल १४ वर्षांनी भारतीय संघासोबत एक अनोखा योगायोग जुळून आला आहे. दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामन्यात शतक झळकावणारा लोकेश राहुल दुसरा भारतीय सलामीवीर […]
ADVERTISEMENT

दक्षिण आफ्रिका दौऱ्याला भारतीय संघाने धडाकेबाज सुरुवात केली आहे. व्हाईस कॅप्टन पदावर प्रमोशन झालेल्या लोकेश राहुलने पहिल्याच कसोटी सामन्यात खणखणीत शतक झळकावत आपली निवड सार्थ ठरवली आहे. लोकेश राहुलच्या या शतकामुळे दक्षिण आफ्रिकेत तब्बल १४ वर्षांनी भारतीय संघासोबत एक अनोखा योगायोग जुळून आला आहे.
दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामन्यात शतक झळकावणारा लोकेश राहुल दुसरा भारतीय सलामीवीर ठरला आहे. २००७ साली केप टाऊन कसोटी सामन्यात मुंबईच्या वासिम जाफरने शतक झळकावत हा बहुमान पटकावला होता. यानंतर भारतीय सलामीवीरांना आफ्रिकेत चांगली कामगिरी करता आलेली नव्हती. परंतू १४ वर्षांचा हा वनवास संपवत लोकेश राहुलने स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलं आहे.
कसोटी कारकिर्दीतलं लोकेश राहुलचं हे सातवं शतक ठरलं आहे. २१८ बॉलमध्ये १४ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने लोकेश राहुलने आपलं शतक पूर्ण केलं. महत्वाची गोष्ट म्हणजे २००७ साली वासिम जाफरने झळकावलेल्या शतकानंतर तीन भारतीयांना आफ्रिकेत शतक झळकावण्याची संधी आली होती, ज्यात लोकेश राहुलचाही समावेश होता. परंतू त्या सामन्यात तो ९० धावांवर नाबाद राहिला.
त्याव्यतिरीक्त मुरली विजय ९७ आणि गौतम गंभीर ने ९३ रन्सची इनिंग खेळून वासिम जाफरच्या पंगतीत मानाचं स्थान पटकावण्याचा प्रयत्न केला होता.