महाराष्ट्र हादरला, MPSC परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या राज्यकर अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला, हत्या की आत्महत्या?
Beed Crime News : अधिकची माहिती अशी की, सचिन जाधव यांच्या पत्नीने आज सकाळी ते रात्री घरी परत न आल्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली. मात्र काही तासांतच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागात एका गाडीमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महाराष्ट्र हादरला, MPSC परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या राज्यकर अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला,
हत्या की आत्महत्या? पोलिसांकडून तपास सुरु
Beed Crime News, रोहिदास हातागळे/बीड- : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत 2012 साली राज्यात प्रथम क्रमांक पटकावलेले आणि इंग्रजी व्याकरणाचे लेखक म्हणून ओळख असलेले राज्यकर अधिकारी सचिन नारायण जाधवर यांचा बीड जिल्ह्यात संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आलीये. यामळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. हा मृत्यू हत्या आहे की आत्महत्या, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून पोलीस प्रशासनाकडून सखोल तपास सुरू आहे.
राज्यकर अधिकारी सचिन जाधवर यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ
अधिकची माहिती अशी की, सचिन जाधवर यांच्या पत्नीने आज सकाळी ते रात्री घरी परत न आल्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली. मात्र काही तासांतच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागात एका गाडीमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
हेही वाचा : मुंबईचा शिवसेनेचा महापौर करण्यासाठी वेगळी गणितं जुळवणार का? उद्धव ठाकरे म्हणाले..
प्राथमिक माहितीनुसार, ज्या कारमध्ये सचिन जाधवर यांचा मृतदेह आढळून आला, त्या गाडीमध्ये एक मडके सापडले असून गाडीच्या खालीही एक मडके आढळून आले आहे. विशेष म्हणजे या मडक्यांमध्ये कोळसे असल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब अत्यंत संशयास्पद असून मृत्यूच्या कारणांबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.










