India Today Conclave : 'वनडे क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी...',सचिन तेंडुलकरने सांगितला प्लान

वनडे क्रिकेट आता खुपच बोरींग झाला आहे. या खेळाच्या फॉरमॅटला जिवंत ठेवण्यासाठी बदलावाची गरज आहे, असे विधान क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने केले आहे.
सचिन तेंडुलकरची इंडिया टूडे कॉनक्लेवमध्ये मुलाखत
सचिन तेंडुलकरची इंडिया टूडे कॉनक्लेवमध्ये मुलाखत (Aaj Tak)

Sachin Tendulkar on India Today Conclave 2023 :वनडे क्रिकेट आता खुपच बोरींग झाला आहे. या खेळाच्या फॉरमॅटला जिवंत ठेवण्यासाठी बदलावाची गरज आहे, असे विधान क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने केले आहे. सचिन तेंडुलकर शुक्रवारी इंडिया टूडे कॉनक्लेवमध्ये चर्चेसाठी सहभागी झाला होता. यावेळी Sachinism and the idea of India या सेशनमध्ये सचिनने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी, वनडे वर्ल्ड कप आणि वनडे क्रिकेटचे भविष्य यासह मैदानावरील अनेक मजेदार किस्से सांगितले होते.(sachin tendulkar tell the plan to alive one day cricket format exclusive interview in india today conclave 2023)

ही गोष्ट मीही मान्य करतोय की वनडे क्रिकेट बोरींग होत चालला आहे. जर तूम्ही 50 ओव्हर्सच्या सामन्यात दोन बॉल देता, तेव्हा तुम्ही रिव्हर्स स्विंग संपवून टाकता. आता तुम्ही 5 फिल्डर 30 यार्ड सर्कलमध्ये ठेवता तेव्हा स्पिनर्सला अनेक समस्या होतात. त्याला व्यवस्थित गोलंदाजी करता येणार नाही. त्यामुळे वनडे क्रिकेट बोरींग झालाय, त्याला जिवंत करावा लागेल असे मत सचिनने (Sachin Tendulkar) मांडले आहे.

सचिन तेंडुलकरची इंडिया टूडे कॉनक्लेवमध्ये मुलाखत
BCCI चा अध्यक्ष व्हायचं का? सचिन तेंडुलकरने दिलं उत्तर

मी कोणी मेडिकल एक्सपर्ट नाही आहे, पण बॉलवर लाळेचा वापर करणे पुन्हा सुरु केले पाहिजे. गेल्या 100 वर्षापासून असे होत आले आहे. 2020 ला एक चांगला निर्णय घेतला होता. मात्र आता आपण खुप पुढे आलो आहोत. आता बॉलवर लाळेचा पुन्हा एकदा वापर सुरू केला पाहिजे, असे मत सचिन तेंडुलकरने माडंले.

बॉलवर लाळ लावणे चांगले नाही आहे. खेळाडू तर कधी कधी काखेतही बॉल लावतात. मात्र जर बॉल नवीन असेल तर लाळेचा वापर महत्वाचा असतो. लाळही घामापेक्षा वेगळी असते. लाळमुळे बॉलची एक बाजू मजबूत करता, तर दुसरी बाजू कमकुवत करता. आम्ही दुसऱ्या बाजूला स्पर्श करत नाही. त्यामुळे एका बाजूला बॉलचे वजन वाढताना रिव्हर्स स्विंगमध्ये खूप मदत होते,असे सचिनने सांगितले आहे.

सचिन तेंडुलकरची इंडिया टूडे कॉनक्लेवमध्ये मुलाखत
Ind vs Aus 1st Odi : मायदेशात ऑस्ट्रेलियाचेच पारडे जड, आकडे काय सांगतात?

बीसीसीआयचे अध्यक्षपद सांभाळणार का?

सचिन (Sachin Tendulkar) बीसीसीआयचे अध्यक्षपद सांभाळणार का? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. यावर त्याने ठोस उत्तर न देता विषय टाळला होता. मी वेगवान गोलंदाजी करू शकत नाही. एक वेळ असा होता ज्यावेळेस सौरव गांगुलीने विकेट काढले होते, त्यावेळेस तो 140 किलोमीटरच्या वेगाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होता. पण नंतर त्याला कमरेचा त्रास जाणवला. त्यामुळे मी 140 किलोमीटरच्या वेगाने गोलंदाजी करून शकत नाही, असे उत्तर देत त्याने विषय टाळला.

सचिन तेंडुलकरची इंडिया टूडे कॉनक्लेवमध्ये मुलाखत
Sachin Tendulkar ने आजच्याच दिवशी केलेला 'तो' विश्वविक्रम!

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in