Sikandar Shaikh: सिंकदरनं दिलेलं ‘हे’ उत्तर तुमचंही मन जिंकून घेईल!
दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर Sikandar Shaikh Exclusive interview Mumbai Tak: कोल्हापूर: महाराष्ट्र केसरी 2023 (Maharashtra Kesari) ची गदा ही पैलवान सिकंदर शेख (Sikandar Shaikh) हाच पटकवणार असी चर्चा अवघ्या महाराष्ट्रात होती. कारण आजवर अनेक बड्या-बड्या मल्लांना आस्मान दाखवणारा हा ढाण्या वाघ आहेच तेवढ्या ताकदीचा. पण उपांत्य फेरीत एक अशी घटना घडली की सिकंदरसह अवघ्या महाराष्ट्रालाही धक्का […]
ADVERTISEMENT

दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर
Sikandar Shaikh Exclusive interview Mumbai Tak: कोल्हापूर: महाराष्ट्र केसरी 2023 (Maharashtra Kesari) ची गदा ही पैलवान सिकंदर शेख (Sikandar Shaikh) हाच पटकवणार असी चर्चा अवघ्या महाराष्ट्रात होती. कारण आजवर अनेक बड्या-बड्या मल्लांना आस्मान दाखवणारा हा ढाण्या वाघ आहेच तेवढ्या ताकदीचा. पण उपांत्य फेरीत एक अशी घटना घडली की सिकंदरसह अवघ्या महाराष्ट्रालाही धक्का बसला. अगदी शेवटच्या क्षणी पंचानी प्रतिस्पर्धी मल्लाला 4 गुण दिल्याने सिंकदरचा पराभव झाला. यानंतर अवघ्या महाराष्ट्रातून या निर्णयावर प्रचंड टीका केली जात आहे. याचबाबत स्वत: सिकंदर शेखने मुंबई Tak ला दिलेल्या विशेष मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (sikandar shaikh answer will win your heart too this is called a real player exclusive interview with mumbai tak )
यावेळी दिलेल्या एका उत्तराने सिंकदरने सगळ्यांचं मन जिंकून घेतलं आहे. खरं तर एवढ्या मोठ्या स्पर्धेतील पराभवानंतर अनेक खेळाडू हे खचून जातात. त्यातही वादग्रस्त निकाल असेल तर खेळाडू सगळ्याचं खापर हा स्पर्धेवर फोडतो. पण सिंकदर मात्र, तसं अजिबात करत नाही.
मुंबई Tak ला दिलेल्या मुलाखतीत सिंकदर अगदी सहजपणे म्हणाला की, ‘अन्याय तर झाला.. हे सगळ्या भारताला दिसतं आहे. पण आता तीच गोष्ट धरुन बसलो तर ते योग्य होणार नाही. जे झालं ते मागे सोडा आणि पुढचं बघा.’