भारतीय संघाला मोठा झटका; न्यूझीलंडविरुद्ध ODI मालिकेतून ‘हा’ खेळाडू बाहेर
Shreyas Iyer ruled out of the ODI series against New Zealand न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. मधल्या फळीतील स्टार फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. अय्यर याच्या जागी रजत पाटीदार यांचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एक निवेदन […]
ADVERTISEMENT
Shreyas Iyer ruled out of the ODI series against New Zealand
ADVERTISEMENT
न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. मधल्या फळीतील स्टार फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. अय्यर याच्या जागी रजत पाटीदार यांचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयसला मालिकेतून बाहेर ठेवण्यात आल्याचे सांगिण्यात आले आहे. आता श्रेयस अय्यरला पुनर्वसनासाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) पाठवण्यात आले आहे.
न्यूझीलंडविरूद्ध भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएस भरत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रजत पाटीदार, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मो. शमी, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक.
हे वाचलं का?
गेल्या वर्षी हिरो ठरला होता श्रेयस
श्रेयस अय्यरसाठी शेवटचे वर्ष म्हणजे 2022 छान होते. तो भारतीय संघासाठी वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने 17 सामन्यात 724 धावा केल्या. पण या नवीन वर्षाची 2023 ची सुरुवात त्याच्यासाठी चांगली राहिलेली नाही. अय्यरने यंदा तीन सामने खेळले आहेत. श्रेयसने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये 28, 28 आणि 38 धावा केल्या. 2022 च्या अखेरीस श्रेयस अय्यरने दोन कसोटी सामने खेळले. त्यात दोन अर्धशतक ठोकले. म्हणजेच श्रेयस अय्यरला 2022 प्रमाणे यंदाही आपला जलवा दाखवता आला नाही. आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला आहे.
दमदार कामगिरीच्या जोरावर पाटीदारची एन्ट्री
टॉप ऑर्डरचा फलंदाज रजत पाटीदार सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. 29 वर्षीय पाटीदारने मध्य प्रदेशकडून खेळताना गेल्या पाच प्रथम श्रेणी सामन्यांपैकी आठ डावांमध्ये एक शतक आणि चार अर्धशतकं झळकावली आहेत. या दमदार कामगिरीच्या जोरावर त्याची न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवड झाली आहे.
ADVERTISEMENT
बुधवारपासून भारत-न्यूझीलंड पहिला वनडे
भारतीय संघ आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका बुधवारपासून (18 जानेवारी) सुरू होणार आहे. पहिला सामना 18 जानेवारीला हैदराबादमध्ये होणार आहे. दुसरा एकदिवसीय सामना 21 जानेवारीला रायपूरमध्ये आणि तिसरा सामना 24 जानेवारीला इंदूरमध्ये खेळवला जाईल. सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 पासून खेळवले जाणार आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT