Ad Hock Committee : अब दंगल होगा! WFI च्या बरखास्तीनंतर नेमली ॲड हॉक कमिटी

मुंबई तक

ADVERTISEMENT

ad hoc committee appointed by the Sports Ministry after the dismissal of the newly elected Board of Wrestling Federation of India
ad hoc committee appointed by the Sports Ministry after the dismissal of the newly elected Board of Wrestling Federation of India
social share
google news

Ad Hock Committee, Wrestling Federation of India : भारतीय कुस्ती महासंघ (WFI)च्या आणखी एका वृत्तामुळे आता खळबळ उडाली आहे. त्यामुळे 24 डिसेंबर रोजी सकाळपासूनच भारतीय कुस्ती महासंघ पुन्हा चर्चेत आला आहे. कुस्ती महासंघाबाबत आता क्रीडा मंत्रालयाकडून (Ministry of Sports) एक मोठं विधान करण्यात आले आहे. क्रीडा मंत्रालयाकडून मोठा आणि धाडसी निर्णय घेत त्यांनी नवनिर्वाचित कुस्ती संघटना विसर्जित करत असल्याचे स्पष्ट केले. क्रीडा मंत्रालयाच्या या निर्णयामुळे हे स्पष्ट करण्यात आले आहे की, आता नुकताच निवडणूक जिंकून अध्यक्ष झालेले संजय सिंह यांना निलंबित केले आहे.

ADVERTISEMENT

प्रकरणाला नवा ट्विस्ट

क्रीडा मंत्रालयाच्या या मोठ्या निर्णयामुळे आता कुस्तीतून संन्यास घेतल्याचा निर्णय जाहीर केलेली साक्षी मलिक आणि कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे आता या प्रकरणाला नवा ट्विस्ट आला आहे.

हे ही वाचा >> WFI Suspended : मोदी सरकारचा तडकाफडकी निर्णय! कुस्ती महासंघ कार्यकारिणी बरखास्त

ॲड हॉक कमिटीचं काम

इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने आता एक नवी हॉक कमिटी स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तर त्याही पुढं जाऊन त्यांनी सांगितले आहे की, 48 तासामध्ये ही समिती स्थापन करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ॲड हॉक कमिटी ही कुस्ती महासंघाच्या दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवण्याचे काम असणार आहे. त्यानंतर ही समिती इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनला आपला अहवाल सादर करणार आहे.

हे वाचलं का?

तडकाफडकी निर्णय

ॲड हॉक कमिटी म्हणजे निर्माण झालेल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी तयार करणयात आलेली समिती. कार्यकारी नेतृत्वाखाली तडकाफडकी अशा प्रकारची समिती बनवली जाते. या समितीविषयी लॅटिन भाषेत माहिती सांगताना म्हटले आहे की, ॲड हॉक समिती म्हणजे केवळ एकाच उद्देशासाठी असा अर्थ स्पष्ट करण्यात आला आहे. ॲड हॉक समितीचे महत्वाचे कार्य हे असणार आहे की, विशेष सल्ला व सूचना देण्याचे असणार आहे. या समितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पार्श्वभूमी असलेले तज्ज्ञ आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा या समितीमध्ये समावेश असतो.

विविध क्षेत्रातील तज्ज्ञ

या कमिटीमध्ये वकील, अकाऊंटंट आणि व्यावसायिक सल्लागारांचा समावेश असतो. त्याच बरोबर डॉक्टर, नर्स आणि चिकित्सक संशोधकांचाही यामध्ये समावेश असतो. मात्र ही समिती मर्यादित कालावधीकरिता बनवली जाते, कारण एकादा वादग्रस्त मुद्दा असेल तर त्याचे निराकारण करण्यासाठी अशी समिती तयार केली जाते.

ADVERTISEMENT

माझी लढाई सरकारबरोबर नाही

भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणूक झाल्यापासून कुस्ती महासंघ वादात सापडला होता. निवडणूक झाल्यानंतर साक्षी मलिकने या निवडीवर दुःख व्यक्त करून आपल्या खेळातील बूट टेबलवर काढून कुस्तीतून आपण संन्यास घेतल्याचे जाहीर केले होते.
त्यानंतर रविवारी जेव्हा क्रीडा मंत्रालयाकडून नवनिर्वाचित संघाला बरखास्त केल्याची बातमी आल्यानंतर साक्षी मलिकने आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, माझी लढाई ही सरकारबरोबर माझी लढाई नाही तर लढाई फक्त खेळासाठी आणि कुस्तीसाठी आहे. मला मुलांची चिंता असल्याचेही तिने यावेळी सांगितले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> पत्नीसह दोन मुलांचं बॅटनं डोकं फोडलं, तिहेरी हत्याकांडानं ठाणे हादरलं

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT