Ind vs Eng : बुकींसाठी काम करणारे ३५ एजंट अटकेत, पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई
पुण्याच्या गहुंजे स्टेडीयमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या दुसऱ्या वन-डे सामन्यावर सट्टा लावणाऱ्या बुकींसाठी एजंट म्हणून काम करणाऱ्या ३५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी रात्री पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुहंजे स्टेडीयमच्या लगत असलेल्या उंच इमारतींच्या गच्चीवरुन तर काही जणांना […]
ADVERTISEMENT
पुण्याच्या गहुंजे स्टेडीयमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या दुसऱ्या वन-डे सामन्यावर सट्टा लावणाऱ्या बुकींसाठी एजंट म्हणून काम करणाऱ्या ३५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी रात्री पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुहंजे स्टेडीयमच्या लगत असलेल्या उंच इमारतींच्या गच्चीवरुन तर काही जणांना स्टेडीयम लगतच्या उंच भागातून अटक केली आहे. हे सर्व एजंट देशातील विविध बुकींसाठी काम करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
गुन्ह्याची कार्यपद्धती ऐकून पोलीसही चक्रावले !
क्रिकेटच्या सामन्यांचं लाईव्ह प्रक्षेपण टिव्हीवर पाहणं हा एक वेगळा अनुभव असतो. परंतू प्रत्यक्ष सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट करत असताना १३ सेकंदांचा टाइम डिले असतो…म्हणजे क्रिकेटच्या मैदानावर घडत असलेला थरार प्रेक्षक म्हणून आपल्याला १३ सेकंद उशीरा दिसत असतो. याचाच फायदा घेऊन हे एजंट मैदाना लगच असलेल्या उंच इमारती आणि डोंगराळ भागावर बसून बुकींना प्रत्येक बॉलची माहिती देत होते. या एजंटच्या माहितीच्या जोरावर देशाच्या विविध भागात बसलेले बुकी हे आपलं काम बिनदिक्कतपणे करत होते. परंतू पोलिसांनी या सर्व एजंटना अटक केली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
दरम्यान, जेसन रॉय, जॉन बेअरस्टो आणि बेन स्टोक्स या तीन प्लेअर्सच्या झंजावाती खेळासमोर टीम इंडियाचा दुसऱ्या वन-डे सामन्यात निभाव लागला नाही. भारतीय संघाने विजयासाठी दिलेलं ३३७ रन्सचं टार्गेट इंग्लंडने सहज पूर्ण केलं. जॉनी बेअरस्टोने १२४ रन्स केल्या तर त्याला बेन स्टोक्सने ९९ आणि जेसन रॉयने ५५ रन्सची इनिंग खेळत चांगली साथ दिली. भारताकडून प्रसिध कृष्णाने दोन विकेट घेतल्या पण इंग्लंडच्या बॅट्समनवर अंकुश लावण्यात त्यांना पूर्णपणे अपयश आलं.
जाणून घ्या शतकवीर लोकेश राहुलच्या ‘या’ सेलिब्रेशनचा अर्थ
ADVERTISEMENT
पहिल्या सामन्यात आश्वासक कामगिरी केल्यानंतर भारतीय संघाचा विश्वास दुणावला होता. परंतू जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी ११० रन्सची पार्टनरशीप केली. दोन्ही बॅट्समननी यावेळी मैदानात चौफेर फटकेबाजी करत टीम इंडियाच्या नाकीनऊ आणले. इंग्लंडच्या बॉलर्सचा रुद्रावतार पाहून भारतीय संघ बॅकफूटवर फेकला गेला. अखेरीस एक चोरटी रन घेताना जेसन रॉय रनआऊट झाला आणि टीम इंडियाला पहिलं यश मिळालं.
ADVERTISEMENT
मात्र यानंतरही इंग्लंडचा संघ थांबला नाही. बेअरस्टोने बेन स्टोक्सच्या साथीने पुन्हा एकदा टीम इंडियाच्या बॉलर्सची धुलाई सुरु केली. आपलं शतक झळकावल्यानंतर बेअरस्टो आणखीन आक्रमक खेळी करायला लागला होता. ११२ बॉलमध्ये ११ फोर आणि ७ सिक्स मारत १२४ रन काढून बेअरस्टो प्रसिध कृष्णाच्या बॉलिंगवर आऊट झाला. परंतू तोपर्यंत सामना भारताच्या हातातून निसटला होता. बेअरस्टो आऊट झाल्यानंतर स्टोक्सने सूत्र आपल्या हाती घेत भारतीय बॉलर्सना सळो की पळो करुन सोडलं. परंतू सेंच्यूरी पूर्ण करण्यासाठी एक रन हवी असताना स्टोक्स भुवनेश्वर कुमारच्या बॉलिंगवर आऊट झाला. त्याने ५२ बॉलमध्ये ४ फोर आणि १० सिक्स लगावत ९९ रन्स केल्या. यानंतर ड्वाइड मलान आणि लिवींगस्टोनने इंग्लंडच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
ADVERTISEMENT