Ind vs Eng T20I Series : भारताच्या गब्बरसमोर आव्हानांचं ‘शिखर’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टेस्ट सिरीजमध्ये ३-१ ने बाजी मारल्यानंतर टीम इंडिया आता सज्ज झाली आहे ती म्हणजे टी-२० सिरीजसाठी. नरेंद्र मोदी मैदानावर आजपासून ५ सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. टी-२० आणि वन-डे सिरीजसाठी टीम इंडियाच्या व्हाईट बॉल स्पेशालिस्टनी संघात पुनरागमन केलंय. वर्षाअखेरीस भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपचा विचार केला असता शिखर धवनला भारतीय संघात आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे.

ADVERTISEMENT

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्मा लिमीटेड ओव्हर सिरीज खेळला नाही. तिकडे शिखर धवन आणि लोकेश राहुलने ओपनिंग केली. पण रोहित शर्मा आता फिट झालाय आणि पुन्हा संघात परतलाय त्यामुळे ओपनिंगसाठी त्याचं नाव हे साहजिकच पहिल्यांदा घेतलं जाईल. मग प्रश्न तयार होतो की रोहितची साथ द्यायची कोणी?? शिखर धवन की लोकेश राहुल….आता वन-डे क्रिकेटचा विचार केला तर रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीने याआधीही ओपनिंग केलंय आणि त्यांची कामगिरीही चांगली होत आलीये. पण जिकडे गोष्ट टी-२० क्रिकेटची येते तिकडे टीम इंडियाच्या गब्बरचे आकडे काहीसे चिंताजनक आहेत.

टी-२० क्रिकेटमध्ये शिखर धवनचा फॉर्म हा म्हणावा तसा नाहीये. कामगिरीत सातत्य नसणं हे टी-२० क्रिकेटमध्ये शिखर धवनसाठी मारक ठरतंय. त्यामुळे आजपासून जी टी-२० सिरीज सुरु होणार आहे तिकडेही टीम इंडियाचं मॅनेजमेंट शिखर धवन ऐवजी लोकेश राहुलला ओपनिंगसाठी चान्स देऊ शकतं. त्यामुळे यापुढची परिस्थिती गब्बरसाठी करो या मरो अशी असणार आहे.

हे वाचलं का?

आता शिखर आणि लोकेश राहुलची आकडेवारी काय सांगते हे आपण पाहूया….

२०१९ पासून शिखरने १८ मॅचमध्ये २५.७ च्या अॅव्हरेजने ४७३ रन्स केल्या आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या सर्व रन्स शिखरने ओपनिंगला येताना केल्या आहेत.

ADVERTISEMENT

दुसरीकडे लोकेश राहुलने याच कालावधीत २० मॅच खेळून ४४.७ च्या अॅव्हरेजने ७६० रन्स केल्या आहेत.

ADVERTISEMENT

याव्यतिरीक्त ओव्हरऑल टी-२० क्रिकेटचा विचार केला तिकडे राहुलचं पारडं हे शिखरपेक्षा जड आहे. २८ वर्षीय राहुलने ४५ मॅचमध्ये ४४.५ च्या अॅव्हरेजने १५४२ रन्स केल्या आहेत.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे टी-२० क्रिकेटमध्ये राहुलच्या नावावर १२ हाफ सेंच्युरी आणि २ सेंच्युरी जमा आहेत.

दुसऱ्या बाजूला शिखर धवने आतापर्यंत ६४ मॅचमध्ये १६६९ रन्स केल्या आहेत. परंतू इथे शिखरचं अॅव्हरेज हे फक्त २८.२८ आणि स्ट्राईक रेट हा १२.२८ चा आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे ओपनिंगला येऊनही शिखरच्या नावावर टी-२० क्रिकेटमध्ये सेंच्युरीची नोंद नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा शिखरच्या तुलनेत लोकेश राहुलचं पारडं इथे जड असलेलं पहायला मिळतं.

टीम इंडियाची सध्याची परिस्थिती पाहता शिखर धवन आणि लोकेश राहुल यांना एकाच वेळी प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणं शक्य नाहीये. कारण शिखर आणि राहुल दोघांनाही संधी दिली तर मग तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीची जागा बदलावी लागेल. आणि विराटसारख्या खेळाडूची तिसऱ्या क्रमांकावरची जागा बदलण्याची चूक टीम मॅनेजमेंट करणार नाही. तसेच चौथ्या नंबरच्या स्पॉटवरही श्रेयस अय्यरची दावेदारी आहे त्यामुळे तिकडेही राहुलला संधी देता येणार नाही…शिखर धवन मधल्या फळीत खेळला नसल्यामुळे त्याला साहजिकच ओपनिंगला यावं लागेल. पाचव्या नंबरवर ऋषभ पंत, हार्दिक पांड्यासारखे बॅट्समन फटकेबाजी करण्यासाठी आहेतच…आता यामध्ये जर श्रेयस अय्यरला डावललं तर राहुल आणि शिखर एकाचवेळी संघात खेळू शकतात. पण सध्याचं चित्र पाहता असं होईल याची शक्यता जरा कमीच आहे.

Ind vs Eng T20I Series : या ३ प्रश्नांची उत्तरं शोधू शकेल का भारत?

टी-२० क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की तुमचे जे बेस्ट बॅट्समन असतात त्यांनी सर्वात जास्त बॉल खेळणं गरजेचं असतं. अशा परिस्थितीत शिखर आणि राहुलला एकत्र खेळवून टीम इंडियाचं बॅटींग कॉम्बिनेशन बिघडवून घेण्याची चूक टीम इंडियाची मॅनेजमेंट आता तरी करेल असं वाटत नाही.

इथे शिखर धवनच्या कॅलिबरबद्दल प्रश्न निर्माण करण्याचा हेतू नाही. पण दोघांची तुलना केली तर सध्या लोकेश राहुल हा अधिक चांगल्या फॉर्मात आहे. शिखर धवनमध्येही चांगली फटकेबाजी करण्याची क्षमता आहेच…पण त्याचं इंज्युरी प्रोन असणं आणि कामगिरीत सातत्य नसणं या गोष्टी त्याला मारक ठरतायत…त्यामुळे यापुढचा काळ भारताच्या या गब्बरसाठी खरंच करो या मरो सारखा असणार आहे, आणि यामधून तो कसा सावतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

BLOG : दृष्ट लागण्याजोगे सारे…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT