IND vs PAK Asia Cup : ‘त्या’ पराभवाची भारत करणार परतफेड?; पाकिस्तानसोबतचा सामना का आहे खास?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आशिया चषक (Asia Cup 2022) स्पर्धेत भारतीय संघाचा मुकाबला आज पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानी संघाशी होत आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना होत असून, ही लढत बघण्यासाठी भारत-पाकिस्तानातील क्रिकेट चाहत्यांसह जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. भारतीय संघाचं रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे, तर पाकिस्तानी संघाचं नेतृत्व बाबर आझमकडे असणार आहे.

भारत-पाकिस्तानमधील राजनैतिक संबंध ताणले गेलेले असल्यानं दोन्ही क्रिकेट संघातील सामने बंद आहेत. दोन्ही (India vs Pakistan Match) संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्येच आमने-सामने येतात. त्यामुळे भारतीयांना आणि पाकिस्तानी नागरिकांना दोन्ही क्रिकेट सामन्यांची नेहमीच प्रतिक्षा असते. त्यामुळे आज आजच्या सामन्याकडे सगळ्यांच्या नजरा असणार आहे.

विराट कोहली संघात पुनरागमन

एक ते दीड महिना क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर माजी कर्णधार विराट कोहली पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून पुनरागमन करणार आहे. झिम्बॉबे विरुद्धच्या मालिकेतून कोहली विश्रांती देण्यात आली होती. त्याचबरोबर वेस्ट इंडिजविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतही विराट कोहली खेळला नव्हता. बऱ्याच काळापासून विराट कोहली फार्मात नाहीये, मात्र आशिया चषकात तो चांगली कामगिरी करण्याची आशा आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

India vs Pakistan Match :विश्वचषकातील पराभवाची परतफेड करणार?

गेल्या वर्षी दुबईत झालेल्या टी२० विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. त्याच मैदानावर दोन्ही (India vs Pakistan Match) संघ आमने-सामने येणार आहेत. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तानने पहिल्यांदाच भारताचा पराभव केला होता. या पराभवाची परतफेड भारत करणार का की, पाकिस्तान आधीच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार, यामुळेच आजचा सामना महत्त्वाचा आहे.

कर्णधार म्हणून रोहित शर्माचा पाकिस्तानविरुद्ध पहिलाच टी२० सामना

रोहित शर्मा पाकिस्तान विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी२० सामन्यात पहिल्यांदाच भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. यापूर्वी पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या दोन एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने भारतीय संघाचं नेतृत्व केलेलं आहे.

ADVERTISEMENT

हार्दिक पंड्यासाठी असणार महत्त्वाचा सामना

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यासाठी पाकिस्तान विरुद्ध (India vs Pakistan Match) खेळला जाणारा हा सामना महत्त्वाचा असणार आहे. २०१८ मध्ये झालेल्या आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजी करतानाच हार्दिक पंड्याच्या पाठीचं दुखणं उद्भवलं होतं. त्यामुळे त्याला सामन्यातून स्ट्रेचरवरून नेण्यात आलं होतं. मात्र, आता हार्दिक पंड्या या दुखण्यातून पूर्णपणे बरा झाला असून, सध्या तो फार्मात आहे.

ADVERTISEMENT

India vs Pakistan : स्टेडिममध्ये उसळणार क्रिकेटप्रेमींची गर्दी

दुबई क्रिकेट स्टेडियममध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होत आहे. सायंकाळी ७.३० वाजता सामना होणार आहे. बऱ्याच काळानंतर दोन्ही संघ (India vs Pakistan Match) मैदानात भिडणार असून, हा सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. या सामन्याचा साक्षीदार होण्यासाठी हजारो क्रिकेट चाहते स्टेडियममध्ये असणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT