Asia Cup : ६ फोर, ६ सिक्स मारत सूर्यकुमार यादवची धडाकेबाज खेळी, हाँगकाँगविरोधात विराटचंही अर्धशतक
भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने धडाकेबाज खेळी करत सहा फोर आणि सहा सिक्स मारल्या आहेत. तसंच विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करत हाँगकाँगसमोर १९३ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. दुबई आंतराराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या आशिया चषकातल्या चौथ्या सामन्यात हाँगकाँगने जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताने २० षटकांमध्ये दोन विकेट गमावून १९२ ची धावसंख्या गाठली. भारतीय […]
ADVERTISEMENT

भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने धडाकेबाज खेळी करत सहा फोर आणि सहा सिक्स मारल्या आहेत. तसंच विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करत हाँगकाँगसमोर १९३ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. दुबई आंतराराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या आशिया चषकातल्या चौथ्या सामन्यात हाँगकाँगने जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताने २० षटकांमध्ये दोन विकेट गमावून १९२ ची धावसंख्या गाठली.
भारतीय फलंदाजांची हाँगकाँगविरोधात दमदार कामगिरी
भारतीय फलंदाजांनी हाँगकाँगच्या विरोधात दमदार कामगिरी करत १९२ धावा केल्या आहेत. लोकेश राहुल, विराट कोहली या दोघांनीही फॉर्म परतल्याचं त्यांच्या खेळीतून जाहीर केलं. सूर्यकुमार यादव त्याच्या नेहमीच्या ३६० डिग्री च्या फॉरमॅटमध्ये फटकेबाजी करताना दिसला. विराट आणि सूर्या या जोडीने २७ चेंडूत अर्धशतकी धावांची भागीदारी केली आहे. विराटने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० तील ३१ वं अर्धशतक आज पूर्ण केलं. सूर्यकुमारने २२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्याने २० व्या षटकात ४ षटकार मारले.
रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या दोघांनीही चांगली सुरूवात केली
रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या दोघांनीही चांगली सुरूवात केली होती. मात्र ऐनवेळी हाँगकाँगचा १९ वर्षीय गोलंदाज आयुष शुक्लाने विकेट मिळवून दिली. रोहितने १३ चेंडूत २१ धावांची खेळी आहे. लोकेश आणि विराट कोहली यांनी नंतर चांगली फटकेबाजी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५० धावांची भागिदारी केली. भारताच्या १० षटकात ७० धावा झाल्या होत्या. त्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड मैदानावर आला आणि त्याने लोकेश तसंच विराटशी चर्चा केली.
१३ व्या षटकात मोहम्मद घाझानफरने ही भागिदारी तोडली. लोकेशने ३९ चेंडूंमध्ये दोन षटकार लगावले. ३६ धावा करत तो बाद झाला. विराटसोबत त्याची ४९ चेंडूंवर ५६ धावांची भागिदारी संपुष्टात आली.
A fine half-century for Virat Kohli ?#INDvHK | #AsiaCup2022 | ? Scorecard: https://t.co/4PnOYdeR6H pic.twitter.com/RJC6R5ASto
— ICC (@ICC) August 31, 2022
यानंतर सूर्यकुमार आणि विराटने चांगली फटकेबाजी केली. बऱ्याच दिवसांनी विराटचा खणखणीत षटकार पाहण्यास मिळाला. या दोघांनी १६ व्या षटकात २० धावा केल्या. तसंच एहसास खानने १७ वं षटक खूप चांगलं खेळलं यात त्याने अवघ्या चार धावा दिल्या. विराटने ४० चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. सूर्यकुमारने २२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. सूर्यकुमारने २० व्या षटकात ४ षटकार खेचले. त्यानंतर या दोघांनी २ बाद १९२ धावांपर्यंत पोहचवलं सूर्यकुमारने २६ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि ६ षटकार मारत ६८ धावा केल्या. तर विराट कोहली ४४ चेंडूंमध्ये १ चौकार आणि ३ षटकारांसह ५९ धावांवर नाबाद राहिला.