प्लंबर-कारपेंटर ते क्रिकेटर.. जाणून घ्या ‘या’ खेळाडूचा नेमका प्रवास
ऑस्ट्रेलियन विकेटकिपर मॅथ्यू वेड हा जेव्हा 16 वर्षाचा होता तेव्हा त्याला टेस्टिकुलर कॅन्सर झाला होता. फुटबॉल खेळताना त्याला एकदा दुखापत झाली होती. त्यावेळी त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तेव्हाच त्याला या कॅन्सरबाबत समजलं होतं. त्यानंतर त्यावरील उपचार करुन तो त्यातून बाहेर आला होता. मॅथ्यू वेडचं क्रिकेट करिअर हे काही सहजासहजी घडलेलं नाही. 2018 साली […]
ADVERTISEMENT

ऑस्ट्रेलियन विकेटकिपर मॅथ्यू वेड हा जेव्हा 16 वर्षाचा होता तेव्हा त्याला टेस्टिकुलर कॅन्सर झाला होता.
फुटबॉल खेळताना त्याला एकदा दुखापत झाली होती. त्यावेळी त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तेव्हाच त्याला या कॅन्सरबाबत समजलं होतं. त्यानंतर त्यावरील उपचार करुन तो त्यातून बाहेर आला होता.
मॅथ्यू वेडचं क्रिकेट करिअर हे काही सहजासहजी घडलेलं नाही. 2018 साली तर खराब कामगिरीमुळे त्याला टीम बाहेर जावं लागलं होतं.
या दरम्यान त्याने प्लंबर म्हणून बरेच दिवस कामही केलं होतं.
याशिवाय त्याने कारपेंटरचा देखील कोर्स केला होता.
त्यानंतर काही दिवसाने त्याने कारपेंटर म्हणून देखील काम केलं होतं.
मॅथ्यू वेडने पाकिस्तानविरुद्ध टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये 17 बॉलमध्ये 41 रन केले होते.
या शानदार खेळीत त्याने 4 सिक्स आणि 2 फोर मारले होते.
शाहीन आफ्रिदीच्या सलग तीन बॉलवर त्याने 3 सिक्स मारले होते. तेव्हापासून वेड हा ऑस्ट्रेलियासाठी मॅच विनर ठरला आहे.