ENG vs SA: तीन दिवसीय कसोटी सामना सुरू, महाराणीला वाहिली खास श्रद्धांजली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन दिवसीय कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली. यावेळी संपूर्ण इंग्लंड राणी एलिझाबेथ यांच्या निधनाने शोक व्यक्त करीत आहे. दरम्यान, या सामन्यात खेळाडूंनी वेगळ्या शैलीत राणीला आदरांजली वाहिली. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील निर्णायक क्रिकेट कसोटीचे तीन दिवसीय सामन्यात रूपांतर झाले आहे. पावसानंतर दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर पहिल्या दिवशीचा (गुरुवार) खेळ रद्द करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला वेळे मायादेशी आहे, त्यामुळे तीन दिवसांचा खेळ करण्यात आला आहे.

खेळाडूंनी बांधली काळी पट्टी

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने आधीच सांगितले होते की, खेळाडू आणि प्रशिक्षक राणीच्या सन्मानार्थ काळी पट्टी बांधतील. यानंतर सर्वांनी एक मिनिट मौन पाळले. यानंतर गॉड सेव्ह द किंग हे राष्ट्रगीत वाजवण्यात आले. राणीच्या मृत्यूनंतर देशाचे राष्ट्रगीत बदलण्यात आले आणि ‘गॉड सेव्ह क्वीन’च्या जागी ‘गॉड सेव्ह किंग’ असे म्हटले गेले. यावेळी दोन्ही संघाचे खेळाडू खांद्यावर हात ठेवून एकत्र उभे असल्याचे दिसले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

इंग्लंडने सर्व क्रीडा स्पर्धा रद्द केल्या

राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाल्यानंतर ब्रिटनमधील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या. राणीच्या मृत्यूची बातमी कळताच बीएमडब्ल्यू पीजीए चॅम्पियनशिपमधील दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. हा गोल्फ कोर्स शुक्रवारीही बंद राहणार आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने सांगितले की, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ओव्हल येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात शुक्रवारी कोणताही खेळ होणार नाही.

याशिवाय ब्रिटनमधील हॉर्स रेसिंग आणि रग्बी सामनेही रद्द करण्यात आले आहेत. ब्रिटनमधील सायकलिंग टूरच्या आयोजकांनी सांगितले की शुक्रवारची शर्यत रद्द करण्यात आली आहे. प्रीमियर लीगच्या खाली तीन विभाग चालवणाऱ्या इंग्लिश फुटबॉल लीगने सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी होणारे सामने रद्द करण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT