IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्सच्या अक्षर पटेलला कोरोनाची लागण

मुंबई तक

आयपीएलचा चौदावा सिझन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना आणखी एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. याआधी कोलकाता नाईट रायडर्सच्या नितीश राणाला कोरोनाची लागण झाली होती. दिल्ली कॅपिटल्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याची माहिती दिली आहे. ? UPDATE ? Delhi Capitals all-rounder #AxarPatel has […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

आयपीएलचा चौदावा सिझन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना आणखी एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. याआधी कोलकाता नाईट रायडर्सच्या नितीश राणाला कोरोनाची लागण झाली होती. दिल्ली कॅपिटल्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याची माहिती दिली आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून अक्षर पटेल हॉटेलमध्ये क्वारंटाइन झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सची मेडीकल टीम अक्षरच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे. २८ मार्चला अक्षर पटेल मुंबईतील हॉटेलमध्ये दाखल झाला होता.

एकीकडे महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील जनतेशी संवाद साधत असताना दोन दिवसांत पर्याय मिळाला नाही तर राज्यात लॉकडाउन लावावा लागेल असे संकेत दिले आहेत. एकीकडे राज्यात लॉकडाउनची टांगती तलवार असताना ९ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या चौदाव्या सिझनवरही गंडातर तयार झालं आहे. १० ते २५ एप्रिलदरम्यान आयपीएलचे सामने मुंबईत खेळवले जाणार आहेत. परंतू राज्यात कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडाउन लागल्यास…मुंबईचे सामने हैदराबादला हलवण्यात येऊ शकतात. बीसीसीआयने हैदराबादचा पर्यायी जागा म्हणून विचार करुन ठेवला आहे. ESPNCricinfo ने यासंदर्भातली बातमी दिली आहे. चेन्नई, मुंबई, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरु अशा सहा शहरांमध्ये यंदाचा हंगाम खेळवला जाणार आहे.

IPL वर टांगती तलवार? वानखेडे मैदानावरील ८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण