टीम इंडियाने मुद्दामहून शनाकाचे शतक होऊ दिले? रोहित शर्माने केला खुलासा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गुवाहाटी येथे झालेल्या पहिल्या वनडेत भारताने श्रीलंकेवर 67 धावांनी विजय मिळवला. विराट कोहलीच्या शानदार शतकामुळे भारतीय संघाने 373 धावांची मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात श्रीलंकेला 306 धावा करता आल्या. या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकानेही आपले शतक पूर्ण केले. 98 धावांवर तो धावबाद होणार होता, पण टीम इंडियाने त्याला जीवदान दिले.

ADVERTISEMENT

श्रीलंकेच्या डावाच्या शेवटच्या षटकात दासुन शनाका 98 धावांवर खेळत असताना मोहम्मद शमीने त्याला मंकड धावबाद केले. मोहम्मद शमीने अंपायरकडे अपील केली. त्यानंतर फील्ड अंपायर थर्ड अंपायरकडे वळले. मात्र, यादरम्यान कॅप्टन रोहित शर्माची एन्ट्री झाली आणि तो मोहम्मद शमीशी बोलला. त्यानंतर टीम इंडियाने रनआउटचे अपील मागे घेतले.

रोहित शर्मानं केला खुलासा

सामना संपल्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये कर्णधार रोहित शर्माने याचा खुलासा केला. रोहित शर्माने सांगितले की, मोहम्मद शमीने अपील केले होते, पण दसून 98 धावांवर खेळत होता. त्याने शानदार फलंदाजी केली आणि आम्हाला त्याला असे बाहेर काढायचे नव्हते. आम्हाला त्याला योग्य मार्गाने बाहेर काढायचे होते, पण मंकड विकेट त्यापैकी नव्हती. यामुळेच आम्ही आमचे अपील मागे घेतले आहे.

हे वाचलं का?

दासून शनाकाचे शतक व्यर्थ

टीम इंडियाने अपील मागे घेतल्यानंतर दासून शनाकाने आपले शतक पूर्ण केले. दासूनने 88 चेंडूत 103 धावांची खेळी खेळली, या खेळीत त्याने 12 चौकार आणि 3 षटकार मारले. या खेळीनंतरही श्रीलंकेला सामना जिंकता आला नाही आणि 50 षटकांत 306 धावा केल्या. श्रीलंकेने हा सामना 67 धावांनी गमावला आणि मालिकेत 0-1 ने पिछाडीवर पडली.

ADVERTISEMENT

विराटचा शतक

विशेष म्हणजे 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना 10 जानेवारी रोजी गुवाहाटी येथे खेळला गेला. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली आणि भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली. रोहित शर्माने 83, शुभमन गिलने 70, विराट कोहलीने 113 धावा केल्या. या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 373 धावा केल्या, प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 306 धावा करू शकला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT