तुम्हाला या स्टार क्रिकेटर्सचे निक नेम माहितीयेत?
महेंद्रसिंह धोनी: धोनीला सगळे कॅप्टन कूल म्हणूनच ओळखतात. पण अवघं क्रिकेट विश्व आणि चाहते त्याला ‘माही’ अशीच हाक मारतात. पण त्याचा घरचे लोक त्याला ‘मही’ या टोपण नावाने बोलवतात. राहुल द्रविड: ‘दी वॉल’ नावाने प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडला भारतीय संघातील खेळाडू ‘जेमी’ नावाने हाक मारायचे. अजित आगरकर: अजित आगरकरला ‘बॉम्बे डक’ नावाने सर्व खेळाडू हाक […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
महेंद्रसिंह धोनी: धोनीला सगळे कॅप्टन कूल म्हणूनच ओळखतात. पण अवघं क्रिकेट विश्व आणि चाहते त्याला ‘माही’ अशीच हाक मारतात. पण त्याचा घरचे लोक त्याला ‘मही’ या टोपण नावाने बोलवतात.
हे वाचलं का?
राहुल द्रविड: ‘दी वॉल’ नावाने प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडला भारतीय संघातील खेळाडू ‘जेमी’ नावाने हाक मारायचे.
ADVERTISEMENT
अजित आगरकर: अजित आगरकरला ‘बॉम्बे डक’ नावाने सर्व खेळाडू हाक मारतात.
ADVERTISEMENT
युवराज सिंग: युवराजला सगळे सिक्सर किंग म्हणून ओळखतात. तर खेळाडू त्याल युवी म्हणून हाक मारतात.
विराट कोहली: कोहलीला लोक प्रेमाने ‘चिकू’ म्हणून बोलवतात. त्याला हे नाव त्याच्या दिल्लीतील कोच अजित चौधरी यांनी दिलं होतं.
गौतम गंभीर: गौतम गंभीर याला त्याचे सहकारी प्रेमाने ‘गौती’ म्हणून हाक मारतात.
रोहित शर्मा: टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माला त्याचे सहकारी ‘शाना’ नावाने बोलवतात.
सुरेश रैना: भारताचा माजी क्रिकेटर सुरेश रैना याला सोनू असं टोपण नाव आहे. त्याला लहानपणापासूनच या नावाने सर्वजण हाक मारतात.
सचिन तेंडुलकर: सचिन तेंडुलकर याला त्याचे वरिष्ठ सहकारी तेंडल्या नावाने हाक मारायचे तर ज्युनियर खेळाडू ‘पाजी’ नावाने बोलवायचे.
हरभजन सिंह: हरभजन सिंहला सगळेच ‘भज्जी’ म्हणूनच हाक मारतात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT