“विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीला पूजणं बंद करा”; गौतम गंभीर असं का म्हणाला?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारताचा माजी सलामीवीर आणि सध्याचा समालोचक गौैतम गंभीर पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटमधील हिरो संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गौतम म्हणतो की, भारतीय क्रिकेट चाहत्यांनी स्टार खेळाडूंची पूजा करणं बंद करावं, अन्यथा क्रिकेटचं भलं होणार नाही. गौतम गंभीरने एका मुलाखतीत सांगितले की, ड्रेसिंग रूममध्ये कोणताही राक्षस तयार करू नका, फक्त भारतीय क्रिकेटलाच खरा राक्षस होऊ द्या.

ADVERTISEMENT

‘आधी महेंद्रसिंह धोनी आणि आता कोहली’

गौतम गंभीर म्हणाला की, जेव्हा तुम्ही एखाद्याची पूजा करायला सुरुवात करता तेव्हा त्याच्यासोबत उपस्थित असलेले अनेक खेळाडू तिथेच संपतात आणि पुढे जाऊ शकत नाहीत. आधी महेंद्रसिंग धोनी होता आणि आता विराट कोहली आहे. गौतम म्हणाला की, जेव्हा विराट कोहलीने टी-20 सामन्यात शतक झळकावले तेव्हा भुवनेश्वर कुमारच्या शानदार स्पेलबद्दल कोणीही त्याच्याबद्दल बोललं नाही. फक्त विराट कोहलीने केलेल्या शतकाचीच चर्चा जास्त होती, असं गंभीर म्हणाला.

‘या सगळ्याला सोशल मीडिया जबाबदार’ : गंभीर

हे वाचलं का?

पुढे बोलताना त्याने सांगितले की, कॉमेंट्रीमध्ये मी एकटाच होतो ज्याने चार षटकात 4 धावा देऊन 5 विकेट्स घेणे सोपे नाही हे वारंवार नमूद केले. भारताला हिरोंची पूजा यातून बाहेर यावं लागेल. तुम्हाला फक्त भारतीय क्रिकेटला मोठं समजावं लागेल. ही संस्कृती कशी सुरू झाली असा प्रश्न विचारला असता गौतम गंभीरने सोशल मीडियाला कारणीभूत मानलं.

तो म्हणाला की, अशा गोष्टी सोशल मीडियापासून सुरू होतात, तिथे बहुतेक बनावट चाहते असतात. तुमचे किती फॉलोअर्स आहेत याच्या आधारावरच तुम्हाला हिरो बनवलं जातं. गौतम म्हणाला की, 1983 मध्ये जेव्हा भारताने विश्वचषक जिंकला तेव्हा कपिल देव यांच्याबाबतीतही असंच घडलं. त्यानंतर 2007, 2011 विश्वचषकातही असाच प्रकार घडला आणि कर्णधाराला सर्वस्व मानलं गेलं, असं गौतम म्हणाला.

ADVERTISEMENT

एकाच व्यक्तीला हिरो मानल्याबद्दल गौतमची नाराजी

ADVERTISEMENT

गौतम गंभीरने अनेकवेळा याचा उल्लेख केला आहे आणि केवळ एकाच व्यक्तीला हिरो मानल्याबद्दल त्याने वारंवार नाराजी व्यक्त केली आहे. 2011 च्या विश्वचषकातही महेंद्रसिंग धोनीच्या अंतिम सामन्यात वारंवार खेळलेल्या खेळीचे श्रेय घेतल्यानंतरही गौतम गंभीरने अनेकवेळा आक्षेप घेत तो पूर्णपणे सांघिक प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT