Ind vs NZ Test : वानखेडे मैदानावर प्रेक्षकांना १०० टक्के एन्ट्री, राज्य सरकारची परवानगी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

युएईत टी-२० विश्वचषकाचा थरार संपुष्टात आल्यानंतर अवघ्या दोन दिवसांमध्ये क्रिकेट प्रेमींना आणखी एक पर्वणी मिळणार आहे. न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून १७ तारखेला दोन्ही देशांमध्ये टी-२० मालिकेला सुरुवात होतील. दोन्ही देशांमध्ये ३ टी-२० आणि २ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.

ADVERTISEMENT

यापैकी मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यासाठी प्रेक्षकांना मैदानात १०० टक्के एन्ट्री देण्यात आली आहे. राज्य सरकारने यासंदर्भातले आदेश दिले आहेत.

३ डिसेंबरपासून दोन्ही देशांमध्ये मुंबईच्या वानखेडे मैदानावर कसोटी सामना खेळवला जाणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर नियोजित सामन्यासाठी प्रेक्षक क्षमतेच्या 100 टक्के लोकांना प्रवेश देण्यास काहीच हरकत नाही, असे राज्य सरकारने म्हटले आहे. याशिवाय वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सराव शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देखील मुंबई क्रिकेट असोसिएशनने दिलीये.

हे वाचलं का?

Rohit Sharma: ठरलं… भारताच्या टी-20 टीमचा कॅप्टन रोहित शर्माच, न्यूझीलंडविरुद्धच्या सीरीजसाठी संघही जाहीर

अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, उमेश यादव, मयांक अग्रवाल, शुभमन गिल, वृद्धिमान साहा आणि उमेश यादव या शिबिरात सहभागी होणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर नियोजित असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी 100 टक्के प्रेक्षकांना प्रवेश मिळावा, अशी विनंती मुंबई क्रिकेट असोसिएशनने महाराष्ट्र राज्य सरकारला पत्राच्या माध्यमातून केली होती. राज्य सरकारने यासाठी परवानगी दिली आहे.

ADVERTISEMENT

१७ नोव्हेंबरला जयपूरच्या मैदानावर पहिला टी-२० सामना रंगणार आहे. यानंतर १९ नोव्हेंबरला रांचीच्या मैदानावर तर २१ डिसेंबरला कोलकात्याच्या ईडन गार्डन्समध्ये तिसरा आणि अखेरचा टी-२० सामना खेळवला जाईल. या मालिकेनंतर २५ ते २९ नोव्हेंबर दरम्यान कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडीअमवर पहिला कसोटी सामना खेळवला जाईल.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT