FIFA 2022: मेस्सीने रचला इतिहास, तब्बल 36 वर्षांनी अर्जेंटिनाने पटकावला World Cup

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Argentina Vs France FIFA World Cup 2022 Final Updates: कतार: फिफा 2022 विश्चचषकाचा (FIFA World Cup 2022) अंतिम सामन्यात बलाढ्या फ्रान्सला (France) नमवून अखेर अर्जेंटिनाने (Argentina) फुटबॉलचं जेतेपद पटाकवलं आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखायला लावणार हा सामना प्रत्येक क्षणी चाहत्यांची उत्कंठा वाढवणारा होता. अगदी पेनल्टी शूटआऊटमध्ये गेलेल्या या सामन्यात मेस्सीच्या संघाने अप्रतिम कामगिरी करत तब्बल 36 वर्षाने आपल्या संघाला विश्वचषक मिळवून दिला आहे. (messis dream fulfilled argentina became world champion created history by defeating france)

ADVERTISEMENT

लिओनेल मेस्सीला आतापर्यंत अनेकदा विश्वचषकाने हुलकावणी दिली होती. मात्र, यंदा त्याने आणि त्याच्या संघाने तुफान कामगिरी करत कतारमध्ये 2022 चा विश्वचषक दिमाखदारपणे पटकावला आहे.

कतारमधील लुसेल स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा 4-2 असा पराभव केला. या विजयासह अर्जेंटिनाचे विश्वचषक विजेतेपदाचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकला आहे. यापूर्वी त्यांनी 1978 आणि 1986 मध्ये विश्वचषक जिंकला होता. या सामन्यात फ्रान्स एम्बाप्पेने हॅट्ट्रिक केली पण ती संघाला उपयोगी पडली नाही. दुसरीकडे लिओनेल मेस्सीने दोन गोल केले.

हे वाचलं का?

तसं पाहिलं तर अंतिम सामना अतिशय नाट्यमय पद्धतीने संपला. निर्धारित वेळेपर्यंत दोन्ही संघांनी 2-2 गोल केले होते, त्यानंतर सामना एक्स्ट्रा टाइममध्ये गेला जेथे. लिओनेल मेस्सी आणि एमबाप्पे यांनी प्रत्येकी एक गोल केला. अशा प्रकारे सामना पुन्हा 3-3 असा बरोबरीत सुटल्याने अंतिम निकालासाठी पेनल्टी शूटआऊटपर्यंत हा सामना गेला.

पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाचा गोलकिपर एमिलियानो मार्टिनेझने दोन गोल सेव्ह केले, ज्यामुळे अर्जेंटिनाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

ADVERTISEMENT

FIFA World Cup : विजेता कोणीही होवो, नकली ट्रॉफीच घरी घेऊन जावी लागणार!

ADVERTISEMENT

पहिल्या हाफमधील चुरस

अर्जेंटिनाच्या संघाने पूर्वार्धात असा खेळ दाखवला की फ्रान्सचे खेळाडू देखील चक्रावून गेले. रॉड्रिगो डी पॉलने केलेल्या फाऊलमुळे फ्रान्सला 19व्या मिनिटाला फ्री किक मिळाली. मात्र, ही संधी फ्रान्ससाठी व्यर्थ गेली. अँटोनी ग्रिजमनने फ्री किक घेतली ज्यावर जिरुडने हेडरने गोल करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू गोलपोस्टवर गेला.

तीन मिनिटांनंतर, म्हणजेच खेळाच्या 23व्या मिनिटाला अर्जेंटिनाचे चाहते ज्याची वाट पाहत होते तो क्षण आला. यामागचे कारण होते कर्णधार लिओनेल मेस्सीने पेनल्टीवर गोल करण्यात यश मिळवले.

अर्जेंटिनाने 1-0 अशी आघाडी घेतल्यानंतर अर्जेंटिनाने आपली आक्रमकता वाढवली. खेळाच्या 36व्या मिनिटालाच एंजल डी मारियाने अर्जेंटिनासाठी दुसरा गोल केला ज्यामध्ये मेस्सीने महत्त्वाची भूमिका बजावली.

2-0 अशी आघाडी घेतल्यानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंचा उत्साह प्रचंड वाढला होता. त्याचवेळी फ्रान्सचा संघ काहीसा मागे पडला होता. परिणामी, पहिला हाफ संपल्यानंतर अर्जेंटिनाचा संघ दोन गोलने पुढे होता. तसं पाहिलं तर फ्रान्सच्या संघाला पूर्वार्धात एकाही गोलचा प्रयत्न करता आला नाही. तर अर्जेंटिनाने गोल करण्याचे 6 प्रयत्न केले, त्यापैकी 3 शॉट हे अचूक होते.

फ्रान्सचा धडकी भरवणारा खेळ

पहिल्या हाफमध्ये 2-0 ने पिछाडीवर असणारा फ्रान्सचा संघ आता सामना दोन गोल करु शकेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. मात्र, सकारात्मक मानसिकतेने सुरुवात करत फ्रान्सने काही शानदार चाली केल्या. पण फ्रान्सला 79व्या मिनिटाला पेनल्टी मिळाली आणि इथून पुढे सगळा खेळच बदलला.

यावेळी एम्बाप्पेने पेनल्टी किक घेतली. गोलरक्षक मार्टिनेझ पेनल्टी रोखण्यासाठी तयार होता, पण एम्बाप्पेचा फटका त्याला रोखता आला नाही. अशाप्रकारे फ्रान्सने पहिला गोल नोंदवून सामन्यात पुनरागमन केले. ज्यानंतर फ्रान्सच्या संघाचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आणि 82व्या मिनिटाला एम्बाप्पेने पुन्हा एकदा दमदार खेळ दाखवला आणि मार्कस थुरामने दुसरा गोल करून सामना 2-2 असा बरोबरीत आणला.

FIFA वर्ल्डकपमध्ये हिट झाली सर्वात सुंदर रेफरी

पेनल्टी शूट आऊट

यानंतर दोन्ही संघांना निर्धारित वेळेत गोल करता आला नाही, त्यानंतर सामना अतिरिक्त वेळेत गेला. लिओनेल मेस्सी आणि एम्बाप्पे यांनी प्रत्येकी एक गोल केला, ज्यामुळे सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी पेनल्टी शूटआऊटमध्ये चार गोल केले, तर फ्रान्सच्या खेळाडूंना केवळ दोनच गोल करता आले. त्यामुळे या विजयाचा खरा शिल्पकार हा अर्जेंटिनाचा गोलकिपर मार्टिनेझ हाच ठरला. कारण त्याने मोक्याच्या क्षणी फ्रान्सचे दोन गोल सेव्ह केले. ज्यामुळे विश्वचषक अर्जेंटिनाच्या ताब्यात आला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT